कबड्डी स्पर्धेत २४ संघांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 11:56 PM2018-09-20T23:56:51+5:302018-09-20T23:59:00+5:30
पोटेगाव पोलीस मदत केंद्राच्या वतीने वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दुर्गम भागातील युवकांनी या स्पर्धेत सहभाग घेत आपले. क्रीडाकौशल्य दाखविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोटेगाव : पोटेगाव पोलीस मदत केंद्राच्या वतीने वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दुर्गम भागातील युवकांनी या स्पर्धेत सहभाग घेत आपले. क्रीडाकौशल्य दाखविले.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडाकौशल्यांना वाव देण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने जिल्हाभरात कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. पोटेगाव पोलीस मदत केंद्रानेही स्पर्धाआयोजित केली होती. या स्पर्धेत पोटेगाव परिसरात येणाऱ्या गावांमधील युवकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे सुमारे २४ संघ या स्पर्धेत सहभागी झाले. ताडगुडा संघाने प्रथम क्रमांक, गव्हाळ हेटी संघाने द्वितीय तर कोसमघाट संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना रोख बक्षीस, चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पं.स.सदस्य मालता मडावी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्राधिकारी डी.वाय.ढेमरे, पोटेगावचे सरपंच ओंमकारेश्वर शेडमाके, तंटामुक्त अध्यक्ष राजेश मानकर, पोटेगावचे पोलीस पाटील किशोर नरोटे, राजोलीचे पोलीस पाटील वामन बांबोळे, येशू पोटावी, पुरनशाह मडावी, झुरू पोरामी, सुखदेव उसेंडी, चन्नू उसेंडी, केशव कड्यामी आदी उपस्थित होते. स्पर्धेचेआयोजन पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक उमेश चिकणे यांच्यासह पोलीस जवानांनी सहकार्य केले. यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे म्हणाले, स्पर्धा ही हरविण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी खेळली जाते. येथील युवकांमध्ये क्रीडाकौशल्य आहे. त्याला चालना देण्याची गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन पोलीस विभागाच्या वतीने कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. खेळाच्या माध्यमातून करिअर करता येते, असे प्रतिपादन ढुमे यांनी केले.