३४ वर्षांच्या गायकाची आत्महत्या, बाथरुममध्ये आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 01:47 PM2022-11-06T13:47:08+5:302022-11-06T13:48:49+5:30
प्रसिद्ध अमेरिकन गायक ऍरॉन कार्टरचे निधन झाले आहे. कॅलिफोर्निया येथील घरात बाथरुममध्येच त्याचे पार्थिव आढळले.
प्रसिद्ध अमेरिकन गायक ऍरॉन कार्टरचे निधन झाले आहे. कॅलिफोर्निया येथील घरात बाथरुममध्येच त्याचे पार्थिव आढळले. डिप्रेशनमुळे आत्महत्या केल्याचे तेथील वृत्तअहवालांमधून कळते. अमेरिकेचा प्रसिद्ध बैकस्ट्रीट बॉइज या बॅंडचा सदस्य असलेल्या निक कार्टर चा ऍरोन भाऊ होता. ऍरोन केवळ ३४ वर्षांचा होता. 'सध्या हा आमच्यासाठी वाईट काळ असून त्याने हे पाऊल का उचलले याचा शोध आम्ही घेत आहोत', असे निक म्हणाला. यामुळे अमेरिकेतील ऍरोनचे चाहते निराश झाले आहेत.
No…. This @aaroncarter news is heartbreaking… this kid had such a spark. Known him for years and always really liked him, he was warm and really funny. Loved putting on a show and he was good at it. Ill find some pics of us and post more later… damn RIP budddd #aaroncarter
— Tyler Hilton (@TylerHilton) November 5, 2022
अमेरिकन गायक टायलर हिल्टनलाही धक्का बसला आहे. ऍरोन च्या असे अचानक जाण्याचे त्याने दु:ख व्यक्त केले आहे. टायलर ने म्हणले, 'नाही...विश्वासच बसत नाही. या मुलामध्ये खूप टॅलेंट होते. अनेक वर्षांपासून मी ऍरोनला ओळखत होतो. त्याचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता सर्वांचाच तो आवडता होता. मी नंतर त्याच्यासोबतचे काही छायाचित्र पोस्ट करेन. दुखद आहे. तुझ्या आत्म्याला शांती मिळो.'