तैमूरला आशीर्वाद देणा-या तृतीयपंथीयांना करीनानं दिले 51 हजार रूपये
By Admin | Published: July 7, 2017 03:35 PM2017-07-07T15:35:23+5:302017-07-07T16:45:07+5:30
बॉलिवूडचे छोटे नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा मुलगा तैमूर जन्मापासून कोणत्या-न्-कोणत्या कारणावरुन नेहमीच चर्चेत असतो.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - बॉलिवूडचे छोटे नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा मुलगा तैमूर जन्मापासून कोणत्या-न्-कोणत्या कारणावरुन नेहमीच चर्चेत असतो. तैमूरनं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष स्वतःकडे आकर्षित केले आहे. करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर परिवारातील सर्वांचा लाडका आहे. सर्वजण त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. इतकंच नाही तर करीना-सैफच्या चाहत्यांचीही तैमूरच्या प्रत्येक हालचालीवर नजर असते.
आता तैमूर पुन्हा चर्चेत आला आहे कारण करीनानं तैमूरची नजर काढण्यासाठी तृतीयपंथीयांना तब्बल 51 हजार रूपये मोजले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, करीना आणि कपूर खानदानानं तैमूरची नजर उतरवण्याची एक विधी पूर्ण केली आहे. या विधीनुसार तृतीयपंथीयंना बोलावलं जाते व विधी पार पडल्यानंतर आशीर्वाद देणा-या तृतीयपंथीयांना 51 हजार रुपये दिले जातात.
आणखी बातम्या वाचा
(तैमूर नावाला विरोध करणा-यांवर ऋषी संतापले)
दरम्यान काही दिवसांपूर्वी करीना कपूरनं "तैमूर"चे नाव बदलल्याचे वृत्त समोर आले होते. तैमूर जन्मदिवसापासून वादात अडकला आहे. टीकेचा भडीमार होत असतानाही मुलाचे नाव बदलायचे नाही यावर दोघंही सुरुवातीपासून ठाम होते. पण, खुद्द करीनानेच "तैमूर"ला त्याच्या नावाने हाक मारणं बंद केल्याचे वृत्त समोर आले. करीनाने "तैमूर"चे एक गोंडस टोपण नाव ठेवल्याची माहिती समोर आली होती.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना करीनाने सांगितले की, ती "तैमूर"ला "लिटिल जॉन" या नावाने बोलावणे, त्याचा उल्लेख करणं सुरू केले आहे. दरम्यान, "तैमूर" या नावावर बराच वाद निर्माण झाला होता. यामुळे करीना आणि सैफ दोघांवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. या वादावर प्रतिक्रिया देताना सैफने म्हटले होते की, इतिहासाबाबत कमी माहिती आहे. त्यामुळे "तैमूर" नावाचा कुणी क्रूर राजा होता की नाही, याची माहिती नव्हती. मात्र मी त्याच्या नावावरुन माझ्या मुलाचे नाव ठेवलेले नाही. मला हे नाव खूप आवडत होते म्हणून मी माझ्या मुलाचे नाव "तैमूर" ठेवले".
सैफनेही एक मुलाखतीदरम्यान म्हटले होते की "भविष्यात तैमूरला कोणत्याही अडचणींना सामोरं जावे लागू नये. तसेच या नावामुळे त्याचा द्वेष अथवा बदनामी व्हावी, अशी माझी इच्छा नाही.