पैशांसाठी मोठ्या उद्योगपतींसोबत लग्न केलेल्या 8 अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 02:42 PM2018-03-29T14:42:57+5:302018-03-29T14:45:31+5:30

महत्वाची गोष्ट म्हणजे यात काही मोठ्या अभिनेत्रींचीही नावे आहेत. या अभिनेत्रींनी पैशांसाठीच मोठ्या उद्योगपतींसोबत लग्न केल्याचं बोललं जातं.

8 actress married for big money businessmen! | पैशांसाठी मोठ्या उद्योगपतींसोबत लग्न केलेल्या 8 अभिनेत्री!

पैशांसाठी मोठ्या उद्योगपतींसोबत लग्न केलेल्या 8 अभिनेत्री!

googlenewsNext

पैशांशिवाय या जगात काहीच होऊ शकत नाही, असं आपण नेहमी ऐकत असतो. काही जणांना हे मान्य असतं तर काहींना नाही. पण बॉलिवूडमध्ये याची काही उदाहरणं बघायला मिळतात. काही अभिनेत्रींनी केवळ पैशांसाठी आणि सतत चर्चेत राहण्यासाठी देशातील बड्या उद्योगपतींसोबत संसार थाटल्याचं बोललं जातं. इतकंच नाहीतर यातील काही अभिनेत्रींनी तर या उद्योगपतींसोबत लग्न करण्यासाठी आपलं करिअरही धोक्यात टाकलं. महत्वाची गोष्ट म्हणजे यात काही मोठ्या अभिनेत्रींचीही नावे आहेत. या अभिनेत्रींनी पैशांसाठीच मोठ्या उद्योगपतींसोबत लग्न केल्याचं बोललं जातं.

8) सेलेना जेटली - पीटर हॉग

सेलेना जेटली एकेकाळी बॉलिवूडमधील एक मोठं नाव होतं. काही सिनेमे करूनही तिला हवं तसं यश आणि हवे तेवढे पैसे मिळत नव्हते. त्यामुळे केवळ हॉट अभिनेत्री अशी इमेज झालेल्या सेलेनाने बॉलिवूडला रामराम ठोकत ऑस्ट्रियाच्या पीटर हॉग नावाच्या श्रीमंत उद्योगपतीसोबत संसार थाटला. 

7) टीना अंबानी - अनिल अंबानी

80 च्या दशकात टीना मुनीम म्हणजे आत्ताची टीना अंबानीने चांगलीच धमाल उडवून दिली होती. त्या काळातील अनेक मोठ्या स्टार्ससोबत तिने सुपरहिट सिनेमे दिले. त्यातून टीनाने चांगलं नाव आणि चांगला पैसाही कमवला. दरम्यानच्या काळात टीना आणि राजेश खन्ना यांच्या चर्चाही रंगल्या होत्या. दोघांचे वादही झाले. नंतर टीनाकडून पैसाही गेला आणि  तिला सिनेमेबी कमी मिळू लागले. अशात तिचे परिचय अनिल अंबानीसोबत झाला आणि पुढे त्यांनी लग्न केले. 

6) डिम्पल गांगुली - राहुल महाजन

डिम्पल गांगुली आणि राहुल महाजन ही जोडी बिग बॉसमधून चर्चेत आली होती. सेक्टर या एकाच सिनेमात तिने काम केले होते. पण पुढे तिला एकही सिनेमा मिळाला नाही. नंतर तिने श्रीमंत बॉयफ्रेन्ड राहुल महाजनसोबत लग्न केलं.

5) किम शर्मा - अलि पुजांनी

मोहब्बते आणि आणखीही काही सिनेमातून दिसलेली किस शर्मा बॉलिवूडमध्ये हवं तसं य़श मिळवू शकली नाही. हॉट अभिनेत्री इतकीच तिची इमेज बनून राहिली होती. अशात तिच्या जीवनात स्पेन येथील श्रीमंत कार्लोस नावाचा व्यक्ती आला. पण त्यांचं नाचं फार काळ टिकलं नाही. पुढे भारतीय वंशाचा केनियन बिझनेसमन अलि पुंजानी तिच्या आयुष्यात आला. कार्लोसपासून दूर जात किमने  अलिसोबत लग्न केले. इथेही पैशांनी महत्वाची भूमिका बजावली.

4) आएशा टाकिया - फरहान आझमी

आएशा टाकिया एक हॉट अभिनेत्री असण्यासोबतच एक प्रसिध्द मॉडलही होती. आएशा छोट्या पडद्यावरही धमाल करत होती. अशातच अचानक लग्न करून तिने तिच्या चाहत्यांना धक्का दिला. राजकीय नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीसोबत तिने लग्न केले. 

3) विद्या बालन - सिध्दार्थ रॉय कपूर

विद्या बालनचं करीअर चांगलं जोमात असताना तिने लग्न केलं. त्याआधी तिचं शाहिद कपूरसोबतचं अफेअर चांगलंच गाजलं. त्यानंतर तिने सिने निर्माता सिध्दार्थ रॉय कपूर याच्याशी लग्न केले. विद्याने सिध्दार्थ रॉय कपूरसोबत पैशांसाठीच लग्न केल्याची चर्चा रंगली होती. 

2) अम्रिता अरोरा - शकील लडाख

पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर शकीलने अम्रिता अरोरासोबत लग्न केले. लग्नाआधीच अम्रिता गर्भवती राहिल्याने तिच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर दोघांनी लग्न केले. पैशांसाठीच एका घटस्फोट झालेल्या माणसासोबत  अम्रिताने लग्न केल्याची त्यावेळी चर्चा रंगली होती. 

1) शिल्पा शेट्टी - राज कुंद्रा

बॉलिवूडमध्ये यशस्वी इनिंग सुरू असतानाच शिल्पाने दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. अक्षय कुमारसोबत ब्रेकअप झाल्यावर शिल्पाने राज कुंद्रा याच्याशी लग्न केले. भारतीय राज कुंद्रा याचा दुबईमध्ये मोठा बिझनेस आहे. 

Web Title: 8 actress married for big money businessmen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.