शाहरुखच्या आधी या अभिनेत्याला ऑफर करण्यात आला होता 'डर', सिनेमा नाकारल्याचा आजही होतो त्याला पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 09:23 AM2023-12-01T09:23:59+5:302023-12-01T09:29:52+5:30

कमी लोकांना माहिती आहे का हा सिनेमा शाहरुख खानच्या आधी दुसऱ्या एका अभिनेत्याला ऑफर करण्यात आला होता.

90s superstar rahul roy was first choice for 1993 darr not shah rukh khan aashiqui actor still regrets losing it | शाहरुखच्या आधी या अभिनेत्याला ऑफर करण्यात आला होता 'डर', सिनेमा नाकारल्याचा आजही होतो त्याला पश्चाताप

शाहरुखच्या आधी या अभिनेत्याला ऑफर करण्यात आला होता 'डर', सिनेमा नाकारल्याचा आजही होतो त्याला पश्चाताप

सुपरस्टार शाहरुख खान बॉलिवूडचा किंग खान आहे. त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर १००० कोटींपेक्षा जास्त कमाई करतात. २०२३मध्ये रिलीज झालेल्या 'जवान' आणि 'पठाण' सिनेमा त्याचेच उदाहरण आहेत. यश चोप्रा यांच्या 'डर' सिनेमाने शाहरुख खानला सुपरस्टार बनवलं. मात्र खूप कमी लोकांना माहिती आहे का हा सिनेमा शाहरुख खानच्या आधी दुसऱ्या एका अभिनेत्याला ऑफर करण्यात आला होता.  

यश चोप्रा यांचा 'डर' सिनेमा आमिर खान आणि सलमान खान यांना ऑफर करण्यात आले होते, मात्र नेगेटीव्ह भूमिका असल्याने दोघांनी काम करण्यास नकार दिला होता. पण तुम्हाला माहिती आहे का, शाहरुख खानच्या आधी 'डर' सिनेमा राहुल रॉयला ऑफर करण्यात आली होती. मात्र काही कारणामुळे तो या सिनेमाचा भाग होऊ शकला नाही. या गोष्टीचा आजही त्याला पश्चाताप होतो.  


'द कपिल शर्मा शो'च्या एका एपिसोडमध्ये तो म्हणाला होता, ''आशिकीनंतर पहिले सहा महिने माझ्याकडे एकही चित्रपट नव्हता. पण त्यानंतर अचानक मला 49 चित्रपटांसाठी विचारण्यात आले. त्यातील कोणता चित्रपट स्वीकारायचा आणि कोणत्या चित्रपटाला नकार द्यायचा हेच कळत नव्हते. मला आठवते यश चोप्रा यांनी मला पटकथा ऐकवण्यासाठी बोलावले होते. मी इतर चित्रपटांमध्ये खूप व्यग्र होतो आणि माझे बरेचसे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे निर्माते माझ्या तारखांसाठी वाट पाहत होते आणि त्याचमुळे मी त्यांची ऑफर घेऊ शकलो नाही आणि तो चित्रपट होता ‘डर’, जो नंतर शाहरुख खानकडे गेला आणि त्याची कारकीर्द आकाराला आली. त्याची राहुल ही व्यक्तिरेखा मला डोक्यात ठेवून लिहिली गेली होती. तो चित्रपट नाकारल्याबद्दल मला अजूनही खंत वाटते.''

शाहरुख खानचा 'डर' 1993 साली रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. शाहरुख खान, सनी देओलशिवाय जुही चावलानेही 'डर'मध्ये काम केले होते. त्याचे दिग्दर्शक होते यश चोप्रा. हा तो चित्रपट आहे ज्याच्या यशाने शाहरुख खानला सुपरस्टार बनवले.  
 

Web Title: 90s superstar rahul roy was first choice for 1993 darr not shah rukh khan aashiqui actor still regrets losing it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.