आधी स्वतःसाठी केली RIP पोस्ट, मग प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरनं संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 05:55 PM2023-12-11T17:55:53+5:302023-12-11T17:57:22+5:30
28 वर्षांच्या प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरनं आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं.
केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 28 वर्षांच्या प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरनं आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव अजमल शरीफ असून तो केरळमधील अलुवा येथील रहिवासी होता. यात धक्कादायक बाब म्हणजे अजमलनं आत्महत्या करण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर स्वतःसाठीच शोकसंदेश पोस्ट केला होता.
अजमलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. यात त्याने एक फोटो केला होता. ज्यावर 'RIP अजमल शरीफ 1995-2003' असे लिहले होते. तर कॅप्शनमध्ये त्याने म्हटलं, 'अजमल शरीफ यांचं निधन झालं असून ही दुःखद बातमी कळवताना अतिशय दुःख होत आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो'.अजमलची ही पोस्ट पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. स्वत:साठी शोकसंदेश लिहून एखादी व्यक्ती आत्महत्या कशी काय करू शकते, असे नेटकरी म्हणत आहेत.
शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अजमल हा त्याच्या खोलीत लटकलेला आढळून आला. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, 'चांगली नोकरी मिळत नसल्याने तो थोडा नैराश्यात होता', अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. रिपोर्टनुसार, अजमलचे इन्स्टाग्रामवर 14 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.