'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत मोठा ट्विस्ट, निशीच्या आयुष्यात निकिता नावाचं वादळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 02:16 PM2024-06-28T14:16:58+5:302024-06-28T14:17:30+5:30

'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत रघुनाथ आणि उमाचा संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे निशी नीरजसोबत मुंबईत जाते. तिथे तिच्या आयुष्यात निकिता नावाचा नवीन वादळ येणार आहे.

A big twist in the series 'Saara Kahi Tichyasathi', a storm named Nikita in Nishi's life | 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत मोठा ट्विस्ट, निशीच्या आयुष्यात निकिता नावाचं वादळ

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत मोठा ट्विस्ट, निशीच्या आयुष्यात निकिता नावाचं वादळ

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) मालिकेला कमी कालावधीत चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत रघुनाथ आणि उमाचा संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे निशी नीरजसोबत मुंबईत जाते. तिथे तिच्या आयुष्यात निकिता नावाचा नवीन वादळ येणार आहे.  

रघुनाथवर चोरीचा आरोप करण्यात आला होता. श्याम पोलिसांना सांगतो की हे पैसे मीच त्यांना दिले होते. पण माझ्या डोक्यातून गेले. रघुनाथ खोतांबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही ही फॅक्टरीच त्यांच्यामुळे उभी आहे. हे ऐकून पोलीस दादा खोतांवर कारवाई न करता निघून जातात. शिर्केचा प्लान फसतो. रघुनाथ एक स्वाभिमानी व्यक्ती आहे एवढं सगळं झालयावर तिथे थांबणं त्यांना ठीक वाटत नाही आणि ते तिकडून निघून जाण्याचा निर्णय घेतात.

निशीच्या आयुष्यात येणार एक नवीन वादळ

दुसरीकडे रघुनाथच्या लेकीच्या म्हणजेच निशीच्या आयुष्यात एक नवीन वादळ येणार आहे. निशी आणि नीरजला सगळे कुटुंब निरोप देते. निशीची रीतसर पाठवणी होते. जाताना निशी ओवीला आणि श्रीनुला आपले दुभंगलेले घर पुन्हा जोडण्यासाठी प्रयत्न करा म्हणून विनंती करते. मेघना चारुला नेमकं ह्याच्या उलट सांगते कारण हे एकत्र आले तर श्रीनू तुझ्या हातून निघून जाईल. 

मुंबईला निशीचा सून म्हणून नव्या घरात गृहप्रवेश होतो. तिथे निशीची ओळख होते ती साहिलची बहिण सलोनी आणि बिझनेस पार्टनरची मुलगी निकिताशी. निशी माप ओलांडून घरात येणार त्या आधीच नीरज पुढे होऊन निकिताला मिठी मारतो. निशी ते पाहून हादरते. पुढे काय वाढून ठेवलंय निशीच्या आयुष्यात ? आयुष्यात आलेलं निकिता नावाच्या वादळशी कशी सामोरी जाईल निशी? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: A big twist in the series 'Saara Kahi Tichyasathi', a storm named Nikita in Nishi's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.