Pushpa 2 संदर्भात मोठी अपडेट आली समोर, ही आहे चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 12:42 PM2023-09-15T12:42:37+5:302023-09-15T12:43:51+5:30

२०२१मध्ये रिलीज झालेल्या पुष्पा (Pushpa Movie) या साऊथ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यावेळी चाहत्यांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले. त्या चित्रपटानंतर लोक पुष्पा २ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

A big update regarding Pushpa 2 is out, here is the complete star cast of the film | Pushpa 2 संदर्भात मोठी अपडेट आली समोर, ही आहे चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट

Pushpa 2 संदर्भात मोठी अपडेट आली समोर, ही आहे चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट

googlenewsNext

२ वर्षांपूर्वी २०२१मध्ये रिलीज झालेल्या पुष्पा (Pushpa Movie) या साऊथ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यावेळी चाहत्यांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले. त्या चित्रपटानंतर लोक पुष्पा २ची आतुरतेने वाट पाहत होते. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. पुष्पा २ लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

पुष्पा २ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. अल्लू अर्जुनचा हा आगामी चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. साऊथची हुशार आणि सुंदर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा अल्लू अर्जुनसोबत पुष्पा २ या चित्रपटात दिसणार आहे. तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली होती. या चित्रपटात अभिनेत्री प्रियमणीही दिसणार आहे. ती एक अतिशय अप्रतिम अभिनेत्री आहे जिने आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावले आहे. साऊथ स्टार विजय सेतुपती देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. या यादीत साऊथचे स्टार प्रकाश राज यांचेही नाव आहे. साऊथचा अभिनेता सुनीलही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

'पुष्पा २'ची कथा अशी असणार
रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक सुकुमार आणि त्यांची संपूर्ण टीम 'पुष्पा २: द रुल'चे शूटिंग काही आठवड्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. टीम अ‍ॅक्शन सिनेमासाठी पोस्ट-प्रॉडक्शन शेड्यूलची देखील योजना करत आहे, जे चित्रपटाच्या शुटिंगनंतर लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटात चंदनाच्या तस्करीची संपूर्ण कथा दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि शेवटी फहाद फासिलच्या एंट्रीने कथेत ट्विस्ट आला होता. आता पार्ट २ची कथा अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांच्यातील भांडणापासून सुरू होईल.
 

Web Title: A big update regarding Pushpa 2 is out, here is the complete star cast of the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.