मुलीच्या इच्छेसाठी आईनं गायलं सुरेल गाणं; अभिनेता सोनू सूदनं दिली मोठी ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 15:39 IST2023-01-28T15:39:41+5:302023-01-28T15:39:55+5:30
या व्हिडिओत महिला खूप सुरेल आवाजात गाणे गाताना दिसत आहे. लोकांना महिलेचा आवाज खूप आवडला असून त्यांनी मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली

मुलीच्या इच्छेसाठी आईनं गायलं सुरेल गाणं; अभिनेता सोनू सूदनं दिली मोठी ऑफर
मुंबई - बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना महामारीवेळी अनेक लोकांसाठी देवदूत म्हणून पुढे आला होता. कोरोना संकट काळात सोनू सूदने अनेक लोकांना त्यांच्या घरापर्यंत सुखरुप पोहचवण्याचं काम केले. या कामामुळे देशभरात सोनू सूदच्या नावाची चर्चा होती. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. त्यात महिला गाणे गाताना ऐकायला येते. या महिलेचं गाणं इतके व्हायरल झाले की अभिनेता सोनू सूदने ते त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहे.
सोनू सूदनं महिलेला दिली ऑफर
या व्हिडिओत महिला खूप सुरेल आवाजात गाणे गाताना दिसत आहे. लोकांना महिलेचा आवाज खूप आवडला असून त्यांनी मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली. या व्हिडिओत एक महिला चुलीवर जेवण बनवत आहे. त्या महिलेची मुलगी आईला गाणे गाण्याचा आग्रह करत असते. त्यानंतर सुरुवातीला ती महिला नकार देते. परंतु मुलीनं जास्त आग्रह केल्यानंतर महिलेने तेरे नैना सावन भादो गाणे गाते.
महिलेचा आवाज एका गायिकेसारखा आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्यावर कॅप्शन लिहिलंय, यापेक्षा सुरेल शक्य आहे का? एका मुलीच्या इच्छेसाठी आई गाणे गात आहे. त्यानंतर अभिनेता सोनू सूदने हाच व्हिडिओ शेअर करत त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून म्हटलं की, नंबर पाठवा, आई सिनेमासाठी गाणे गाईल अशी थेट ऑफरच त्याने दिली.
नंबर भेजिए
— sonu sood (@SonuSood) January 27, 2023
माँ फ़िल्म के लिए गाना गाएगी ❤️ https://t.co/rLebxFRhWX
लोकांचा भरभरून प्रतिसाद
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून आतापर्यंत हजारोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोक कमेंट्स करत आहेत. या महिलेच्या गाण्याचं कौतुक करतायेत. अभिनेता सोनू सूदकडेही हा व्हायरल व्हिडिओ पोहचला त्यानंतर त्याने महिलेची मदत करण्याचं ठरवत तिला सिनेमासाठी गाणे गाण्याची ऑफर दिली.