तबलावादक उस्ताद शफात अहमद खान यांना सांगीतिक आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 12:46 PM2022-07-23T12:46:51+5:302022-07-23T12:47:47+5:30

ज्येष्ठ तबलावादक शफात अहमद खान यांना पंचम निषादतर्फे सुरेल सांगीतिक आदरांजली वाहण्यात येणार आहे.

A musical tribute to Tabla player Ustad Shafat Ahmed Khan | तबलावादक उस्ताद शफात अहमद खान यांना सांगीतिक आदरांजली

तबलावादक उस्ताद शफात अहमद खान यांना सांगीतिक आदरांजली

googlenewsNext

ज्येष्ठ तबलावादक शफात अहमद खान यांना पंचम निषादतर्फे सुरेल सांगीतिक आदरांजली वाहण्यात येणार असून ही मैफल रविवार, २४ जुलै २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून दादर, शिवाजी पार्क येथील वीर सावरकर मार्गावरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे रंगणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रसिद्ध गायक रमाकांत गायकवाड यांचा सुरेल सुरावटींचा नजराणा रसिक श्रोत्यांना अनुभवायला मिळणार आहे व त्यांना संवादिनीवर साथ देण्यासाठी अभिनय रवांदे तर, तबल्याची साथ देण्यासाठी रमाकांत करंबेळकर उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध तबलावादक पंडिता अनुराधा पाल यांचा सोलो वादनाचा परफॉर्मन्स सादर होणार असून त्यांना कीबोर्ड वर  तुषार रातुरी साथ करणार आहेत.

तबल्यावर अक्षरशः बरसणाऱ्या शफात भाई यांच्या कलापूर्ण बोटांनी आणि आपल्या कलेने संगीताला अक्षरशः जिवंत करण्याच्या त्यांच्या कौशल्याने जगभरातल्या संगीतप्रेमींची मने त्यांना जिंकून घेतली होती. केवळ तालबद्ध तबल्याच्या परफॉर्मन्समधूनच नव्हे, तर तालाला सुरेलपणाची जोड देऊनही त्यांनी रसिक श्रोत्यांच्या मनावर जादू केली. तबल्याच्या तालामध्येही स्वरांचा सुरेल संगम साधणाऱ्या काही मोजक्या कलाकारांपैकी ते एक होते. अशा अद्वितीय संगीतकाराची व वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीमत्वाची स्मृती कायम जीवंत ठेवणे हीच त्यांना दिलेली खरी मानवंदना ठरते.


पंचम निषाद क्रिएटिव्हचे संचालक शशी व्यास म्हणाले, मी १९८१ मध्ये शफात भाईंना पहिल्यांदा ऐकले. जागतिक किर्तीचे कथक नृत्यकार पद्मविभूषण बिरजू महाराज यांना तालबद्ध साथ देण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आले होते. जेव्हा या दोन दिग्गजांना एकत्र येऊन आपापले परफॉर्मन्स सादर केले, तेव्हा त्यानंतरचे दोन तास हे केवळ मंतरलेले क्षणच होते. बिरजू महाराजांच्या अतुलनीय नृत्याविष्कारांनी आणि त्याच तोडीच्या शफात भाई यांच्या तबल्यावरील अद्वितीय थापांनी संपूर्ण परफॉर्मन्सला एक प्रकारची चमक आली होती. त्या भन्नाट मैफलीमुळे मी संपूर्णतः भारवून गेलो होतो. आजही ती मैफल हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव आहे. ही आदरांजली म्हणजे या अद्वितीय कलाकाराला त्याच्या भारतीय संगीतसृष्टीतील अनोख्या कार्यासाठी आम्ही केलेला सलामच आहे.

Web Title: A musical tribute to Tabla player Ustad Shafat Ahmed Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.