'आई कुठे काय करते'मध्ये नवा ट्विस्ट, अरुंधती-आशुतोषच्या लग्नाच्या बोलणीदरम्यान येणार नवं विघ्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 12:23 PM2023-01-30T12:23:49+5:302023-01-30T12:24:10+5:30
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत सध्या अनघाच्या बाळाच्या बारशाची लगबग पाहायला मिळाली. अनघा आणि अभिच्या मुलीच्या छकुलीच्या बारश्याला देशमुख कुटुंब एकत्र आले आहेत. बाळाचे नाव 'जानकी' असे ठेवले आहे. मात्र यादरम्यान अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची बोलणी होणार आहे. त्यामुळे आता मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे, ज्यात आप्पा सगळ्यांसमोरचा आशुतोषला विचारतात, 'तुम्ही अरुंधतीशी लग्न करायला तयार आहात का?' यावर आशुतोष लगेच त्याचा होकार कळवतो. हे ऐकून घराच्या सगळ्यांनाच धक्का बसतो. पण कांचन आई रागात आप्पांना पुढे येत मनात, 'काय बोलताय तुम्ही? या वयात लग्न करणं हा शुद्ध वेडेपणा आहे.' तिचे हे बोलणे ऐकून आप्पा चिडतात आणि कांचनला आज जर अरुंधतीच्या लग्नाला तयार नसशील ना तर असं म्हणत चक्कर येऊन खाली कोसळतात. अप्पाना कोसळलेले पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो.
आता मालिकेत अरुंधतीच्या पुढ्यात पुन्हा नवीन आव्हान उभे राहणार आहे. आता अप्पांना नेमकं काय झालं, देशमुख कुटुंबीय यातून कसे सावरणार, आप्पा लवकर बरे होणार का आणि अरुंधती-आशुतोषच्या लग्नासाठी सर्वांना तयार करणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील.