"हिंदीत नाही तमिळमध्ये बोल..." ए आर रहमान यांनी पत्नीला स्टेजवरच टोकलं; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 10:57 AM2023-04-27T10:57:19+5:302023-04-27T10:58:38+5:30

ए आर रहमान यांच्या पत्नीने लग्नाआधी दोन अटी ठेवल्या होत्या.

a r rahman asks wife to speak in tamil not in hindi at award show in chennai | "हिंदीत नाही तमिळमध्ये बोल..." ए आर रहमान यांनी पत्नीला स्टेजवरच टोकलं; Video व्हायरल

"हिंदीत नाही तमिळमध्ये बोल..." ए आर रहमान यांनी पत्नीला स्टेजवरच टोकलं; Video व्हायरल

googlenewsNext

प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान (A R Rahman) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. नुकतेच त्यांनी एका इव्हेंटमध्ये पत्नी सायरा बानू सह हजेरी लावली. यावेळी त्यांनी स्टेजवर पत्नीला हिंदी बोलण्यापासून रोखले. तमिळमध्ये बोल असं त्यांनी सर्वांसमोरच पत्नीला सांगितलं. चेन्नईतील अवॉर्ड शो दरम्यान हे घडलं.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ए आर रहमान आणि सायरा बानू स्टेजवर उभे आहेत. यावेळी ए आर रहमान तमिळमध्ये म्हणाले,'मला माझी मुलाखत परत पाहायला आवडत नाही. तरी ही सारखा व्हिडिओ लावते आणि बघत बसते कारण तिला माझा आवाज आवडतो.' हे ऐकून पत्नी सायरा बानो हसते. यानंतर अँकर सायरा बानो यांना बोलायला सांगते.

सायरो बानो बोलायला सुरुवात करणार त्याआधीच ए आर रहमान म्हणतात, 'हिंदीत नाही तमिळमध्ये बोल.' मग त्या म्हणतात, अरे देवा! मला तमिळ इतकी चांगली बोलता येत नाही.' असं सांगत ती इंग्रजीतच बोलते. दोघांचा हा व्हिडिओ बघून तसं तर काही चुकीचं वाटत नाही. उलट ते पत्नीची चेष्टा करत असल्याचं दिसून येतं. ए आर रहमान यांनी असं म्हणताच सर्व सेलिब्रिटींना मात्र खूप हसू येतं आणि अभिमानही वाटतो. 

ए आर रहमान यांच्या पत्नीने लग्नाआधी दोन अटी ठेवल्या होत्या. 'मी इंग्रजीत बोलू शकते का?' आणि 'मला कार चालवायची परवानगी असेल का?' त्यांचा लग्नाआधीचा हा किस्सा चांगलाच चर्चेत आला होता. 1995 साली दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांनी खतीजा, आमीन आणि रहीमा ही तीन मुलं आहेत. मोठी मुलगी खतिजा देखील वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत संगीत क्षेत्रात आली आहे. 

Web Title: a r rahman asks wife to speak in tamil not in hindi at award show in chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.