कंगनाचा पार्टीतील तो व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर रंगली चर्चा, नेटकऱ्यांनी केले ट्रोल...!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 11:17 AM2023-01-27T11:17:31+5:302023-01-27T11:19:19+5:30
Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर ती प्रत्येक मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडते. कंगनाचे गेल्या दीड वर्षापासून ट्विटर बंद करण्यात आले होते, आता पुन्हा कंगनाचे ट्विटर अकाऊंट परत करण्यात आले आहे, या संदर्भात कंगनाने ट्विट करुन माहिती दिली आहे.
सध्या कंगना तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. मात्र याचदरम्यान कंगनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कंगना रणौतचा एक व्हिडीओ ‘फिल्मी कलाकार’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कंगना हातात ग्लास घेऊन सिद्धू मुसेवालाच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. कंगानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, 'नमस्कार मित्रांनो. परत आल्यावर खूप छान वाटतं, असं कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.यासोबत 'इमर्जन्सी' चित्रपटाचा मागील दृश्याचा व्हिडिओही शेअर केला आहे. रिलीज डेटची घोषणााही कंगनाने केली आहे. 'इमर्जन्सी'चे शूटिंग पूर्ण झाले आहे. २० ऑक्टोबर २०२३ रोजी थिएटरमध्ये तुम्ही पाहू शकता असं ट्विटमध्ये म्हटले आहे.
'भारतात फक्त जय श्री राम...'
पठाण चित्रपट द्वेषावर प्रेमाचा विजय असल्याचा दावा करणाऱ्या सर्वांशी मी सहमत आहे, पण कोणाच्या द्वेषावर प्रेमाचा विजय झाला? चला मुद्द्यावर येऊया...तिकीट खरेदी करून कोण चित्रपट यशस्वी करत आहे?, हे भारताचे प्रेम आहे, जिथे ८०% हिंदू राहतात आणि इथे पठाण नावाचा चित्रपट बनवला जातो, ज्यात आपला शत्रू देश पाकिस्तान आणि ISIS दाखवला गेला आणि तो चित्रपट यशस्वीही झाला. ही आपल्या भारताची भावना आहे, असं कंगना म्हणाली.
कंगना पुढे म्हणाले की, आपल्या भारतीयांचे प्रेम आहे, जे द्वेषावर आणि घाणेरड्या राजकारणाच्याही पुढे आहे. पण ज्यांना मोठ्या आशा आहेत, त्यांना मी सांगू इच्छिते की पठाण हा फक्त एक चित्रपट असू शकतो, पण भारतात फक्त जय श्री राम, जय श्री राम हा नाराच राहणार...माझा विश्वास आहे की भारतीय मुस्लीम देशभक्त आहेत आणि अफगाण पठाणांपेक्षा खूप वेगळे आहेत…मुख्य म्हणजे भारत कधीच अफगाणिस्तान होणार नाही, अफगाणिस्तानमध्ये काय चालले आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. तिथे नरकापेक्षाही वाईट परिस्थिती आहे, म्हणून पठाण चित्रपटाचे कथानकानुसार योग्य नाव भारतीय पठाण असायला हवे, असं कंगनाने म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"