पारूने मंगळसूत्र काढल्याने आदित्यचा अपघात, मालिकेवर भडकले प्रेक्षक, म्हणाले- "काहीही अंधश्रद्धा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 01:06 PM2024-07-27T13:06:35+5:302024-07-27T13:06:56+5:30

पारू ही मालिका रंजक वळणावर आहे. पण, लोकप्रिय असणाऱ्या या मालिकेला सध्या मात्र प्रेक्षक ट्रोल करत आहेत. 

aaditya accident after paaru removed her mangalsutra netizens troll marathi serial track | पारूने मंगळसूत्र काढल्याने आदित्यचा अपघात, मालिकेवर भडकले प्रेक्षक, म्हणाले- "काहीही अंधश्रद्धा..."

पारूने मंगळसूत्र काढल्याने आदित्यचा अपघात, मालिकेवर भडकले प्रेक्षक, म्हणाले- "काहीही अंधश्रद्धा..."

'पारू' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील पारू आणि आदित्यची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तर कठोर पण तितक्याच प्रेमळ असणाऱ्या अहिल्यादेवी प्रेक्षकांना आपल्याच घरातील वाटू लागल्या. सध्या पारू ही मालिका रंजक वळणावर आहे. पण, लोकप्रिय असणाऱ्या या मालिकेला सध्या मात्र प्रेक्षक ट्रोल करत आहेत. 

जाहिरातीच्या शूटसाठी आदित्यशी केलेलं लग्न पारूला खरं वाटत असल्यामुळे तिने हरिषशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे मालिकेत ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. आता पारू तिच्या लग्नाचं सत्य आदित्यला सांगणार आहे. पण, त्याबरोबरच मालिकेत आता पारूच्या सौभाग्याची सत्वपरिक्षा पाहायला मिळणार आहे. झी मराठीच्या सोशल मीडियावरुन मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये पारू गळ्यातील मंगळसूत्र काढून देवापुढे ठेवत असल्याचं दिसत आहे. "देवा मी फक्त माझंच सुख बघितलं तर मी स्वार्थी होईन. म्हणून  मी माझं मंगळसूत्र तुझ्या स्वाधीन करतेय" असं पारू म्हणते. पारूने मंगळसूत्र काढताच आदित्यचा मात्र अपघात होत असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. 


मालिकेचा हा नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांचा पारा मात्र चढला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी पारू मालिकेवर नाराजी दर्शविली आहे. "काही तरी लॉजिकल दाखवा सिरीयलमध्ये", "अशी जोडी पहिलीच पाहिली मंगळसूत्र काढलं की नवरा धोक्यात" अशा कमेंट केल्या आहेत. 

"ही फालतुगिरी बंद करा", "एकीकडे दाखवतात की हे शूटिंगचं लग्न आहे आणि मंगळसूत्र काढलं की लगेच अपघात...फालतुगिरी नुसती"

"बंद करा ही फलतुगिरी, जग एकविसाव्या शतकात आहे आणि काहीही अंधश्रद्धा पसरवत आहात तुम्हीठ, असं म्हणत चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

Web Title: aaditya accident after paaru removed her mangalsutra netizens troll marathi serial track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.