Aai Kute Kay Karte : मालिका अत्यंत भंगार..., ‘आई कुठे काय करते’चा ‘तो’ व्हिडीओ अन् कमेंट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 12:14 PM2022-12-23T12:14:54+5:302022-12-23T12:16:18+5:30
Aai Kute Kay Karte : मध्यंतरी ‘आई कुठे काय करते’ च्या कथानकावर प्रेक्षक भडकले होते. आता पुन्हा एकदा ही मालिका ट्रोल होतेय...
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kute Kay Karte ) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका. आता ही मालिका एका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत पुन्हा जुन्या घटनांची पुनरावृत्ती होताना दिसतेय. म्हणजे, काही वर्षांआधी जे काही अरूंधतीच्या आयुष्यात घडलं, तेच तिची सून अनघा हिव्या आयुष्यात घडत आहे. पण अरूंधती सूनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असून, अनघाच्या प्रत्येक निर्णयात तिला सोबत करणार आहे.
अरूंधतीचा मुलगा अभिषेक गर्भवती पत्नी अनघाला सोडून दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवून आहे. मध्यंतरी या कथानकावर प्रेक्षक भडकले होते. आता पुन्हा एकदा ही मालिका ट्रोल होतेय.
सून अनघाला अरुंधती आधार देते. अनघाचे सांत्वन करताना तिच्यासाठी अंगाई गाते. ‘एकदा काय झाले’ या चित्रपटातील ‘बाळाला झोप का गं येत नाही’ ही अंगाई अरुंधतीने गाते. ‘एकदा काय झाले’ हा चित्रपट मराठीतील सुप्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केला आहे. ही अंगाईही त्यांनीच लिहिली आहे.
सलील कुलकर्णी यांनी मालिकेतील अरुंधती अर्थात मधुराणी रोखलेचा अंगाई व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत तिचं कौतुक केलं. या व्हिडीओवर एका युजरने केलेली कमेंट सध्या चर्चेत आहे.
‘ गाणं छान आहे पण मालिका अत्यंत भंगार....,’अशी कमेंट एका युजरने केली. यावर सलील कुलकर्णी लगेच रिअॅक्ट झालेत.
‘ही कमेंट तुम्ही वाहिनीच्या किंवा मालिकेच्या अकाऊंटवर करायला हवी. बरोबर ना?,’ असं त्यांनी संबंधित युजरला सुनावलं. अन्य नेटकऱ्यांनी मात्र अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखलेच्या या व्हिडीओचं कौतुक केलं.
अनघा आता काय निर्णय घेणार?
मालिकेतील कथानकानुसार, अनघाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता अनघा आणि त्यांची लेक देशमुखांच्या घरी परतल्या आहेत. मात्र, या सगळ्यात अनघाने अभिषेकला सतत टाळण्याचा प्रयत्न केला. अभिषेकने केलेली चूक ही अतिशय अक्षम्य असून, अनघाने त्याला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अनघा आता घरी थांबणार की, अरुंधती प्रमाणे देशमुखांचं घर सोडून निघून जाणार? तिचा निर्णय काय असणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं. आहे.