नव्या घरात सत्यनारायणाच्या पूजेसाठी रुपाली भोसलेने बनवला 'हा' पहिला पदार्थ, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 10:32 AM2024-09-30T10:32:22+5:302024-09-30T10:32:44+5:30

रुपालीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Aai Kuthe Kay Karate Fame Actress Rupali Bhosale shared new house kitchen video making Satyanarayan Pooja Prasad Sheera | नव्या घरात सत्यनारायणाच्या पूजेसाठी रुपाली भोसलेने बनवला 'हा' पहिला पदार्थ, पाहा व्हिडीओ

नव्या घरात सत्यनारायणाच्या पूजेसाठी रुपाली भोसलेने बनवला 'हा' पहिला पदार्थ, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री रुपाली भोसले सध्या 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत तिने साकारलेली संजनाची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. यासाठी तिला सर्वोकृष्ट खलनायिकेचा देखील पुरस्कार मिळाला. काही दिवसांपुर्वीच रुपालीने मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे. तिच्या घराचे फोटो आणि व्हिडीओदेखील समोर आले होते. आता पुन्हा एकदा तिच्या घराची झलक पाहायला मिळतेय. 

रुपालीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रुपालीच्या नव्या घरातील सुंदर, टापटीप आणि मॉड्युलर स्वयंपाक घर दिसतेय. यावेळी रुपाली मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळाली.  रुपालीच्या नव्या घरी नुकतंच सत्यनारायण पुजा झाली.  यावेळी तिने खास प्रसादासाठी साजूक तुपातील शिरा बनवला. शिरा बनवतानाचा व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत शेअर केला. कॅप्शमध्ये तिने लिहलं, "सत्यनारायणाचा प्रसाद... स्वयंपाकघर आणि मी म्हणजे प्रेम.  नवीन घराच्या स्वयंपाकघरामधे केलेला पहिला पदार्थ".  इतर कलाकार मंडळी तिला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देताना दिसत आहेत.


रुपाली भोसलेने मेहनतीच्या पैशातून हे घर खरेदी केलं. गेल्या वर्षभरापासून ती घराच्या इंटेरिअरवर काम करत होती. घराचा प्रत्येक कानाकोपरा तिनं स्वतःच्या स्टाइलनं सजवला आहे. रुपाली भोसले ही तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा सोशल मीडियातील वावरही मोठा आहे. फेसबुक, इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. रुपालीने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. बडी दूर से आये है, तेनालीराम, कुलस्वामिनी आणि आयुष्यमान भव या मालिकांमध्ये तिने अभिनय केलाय.

Web Title: Aai Kuthe Kay Karate Fame Actress Rupali Bhosale shared new house kitchen video making Satyanarayan Pooja Prasad Sheera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.