Aai Kuthe Kay Karte : आता निघायची वेळ झाली...कसं करमणार? ‘अरूंधती’ची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 05:48 PM2022-01-11T17:48:33+5:302022-01-11T17:51:49+5:30
Aai Kuthe Kay Karte : खरं तर ही अरूंधतीने मालिकेसंदर्भात लिहिलेली ही साधी पोस्ट. पण तिच्या शेवटच्या वाक्यानं या साध्या सन्पेन्स निर्माण केला आहे...
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं प्रेक्षकांना जणू वेड लावलं आहे. ही मालिका आली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली. मालिकेतील अरूंधती,अनिरूद्ध, संजना या व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय झाल्यात. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत अभि आणि अनघाच्या लग्नाची धामधूम सुरू होती. लग्नसोहळा आनंदात पार पडला आणि आता प्रत्येकजण आपआपल्या कामाला लागलंय. अशात अरूंधती अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने (Madhurani Prabhulkar) हिने एक लक्षवेधी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सध्या तिच्या या पोस्टचीच चर्चा आहे.
मधुराणीने सेटवरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोबत पोस्टमध्ये ती लिहिते, ‘ देशमुखांचं घर गेले महिनाभर अगदी गजबजून गेलेलं.... केळवणा पासून सुरू झाली ही धामधूम, मग संगीत, मेहेंदी, हळद , लग्न , गृहप्रवेश काही विचारू नका... सगळे आपले रोज नटून थटून तयार....!! फारच मजेत गेला हा महिना.... पाहुण्यासारखी कधीतरी सेटवर येणारी आमची सारी जिवलग मंडळी सुद्धा रोज भेटत होती... मग काय गप्पा , किस्से, चहा खारी आणि हशा आणि टाळ्या .... खरोखरच लग्नघर हो...!
या मूडमध्ये सगळे असताना आमच्याकडून काम करून घ्यायला आमचे दिग्दर्शक रवी करमरकर आणि असोसिएट सुबोध बारे यांना त्रासच झाला असणार. पण तेही मुरलेले. आम्हाला वळणावर कसं आणायचं त्यांना चांगलं ठाऊक आहे. तसे आम्ही सगळे थोडेफार सिन्सिअर वगैरे म्हणून हे कार्य पार पडलं हो! आम्हाला सगळ्यांनाच माणसांची ये जा आवडतेच.... भरलेलं घर अजून भरलेलं किती छान वाटतं हो
पण आता सूप वाजणार ...मांडव परतणी होणार ...घरात नवीन सून आली आता अरुंधतीचीही निघायची वेळ झाली इथून...कसं करमणार....!
खरं तर ही अरूंधतीने मालिकेसंदर्भात लिहिलेली ही साधी पोस्ट. पण तिच्या शेवटच्या वाक्यानं या साध्या सन्पेन्स निर्माण केला आहे. होय, अभिच्या लग्नानंतर अरूंधती देशमुख कुटुंबात राहणार की नाही? तिच्या आयुष्यात आता नवं काय घडणार? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. साहजिकच हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.