'आई कुठे काय करते' फेम रुपाली आणि गौरी थिरकल्या 'अंगारो सा' गाण्यावर, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 03:27 PM2024-07-02T15:27:16+5:302024-07-02T15:27:37+5:30

'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसले आणि गौरी कुलकर्णीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दोघीही अंगारो सा गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

aai kuthe kay karte fame actress rupali bhosale and gauri kulkarni dance on angaron sa song | 'आई कुठे काय करते' फेम रुपाली आणि गौरी थिरकल्या 'अंगारो सा' गाण्यावर, व्हिडिओ व्हायरल

'आई कुठे काय करते' फेम रुपाली आणि गौरी थिरकल्या 'अंगारो सा' गाण्यावर, व्हिडिओ व्हायरल

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा २' या दाक्षिणात्य सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. काही दिवसांपूर्वीच 'पुष्पा २'मधील अंगारो सा हे गाणं प्रदर्शित झालं. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटींनाही या गाण्याची भुरळ पडली आहे. अनेक मराठी सेलिब्रिटींनी या गाण्यावर रील व्हिडिओ बनवले आहेत. आता 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अंगारो सा गाण्यावर थिरकल्या आहेत. 

'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसले आणि गौरी कुलकर्णीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दोघीही अंगारो सा गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. अंगारो सा आणि एक लाजरान साजरा मुखडा या फ्युजन गाण्यावर रुपाली आणि गौरी यांनी डान्स केला आहे. गुलाबी साडी आणि पारंपरिक थाट करत रुपाली आणि गौरी या गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळत आहे. गौरीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, नुकतंच रुपाली भोसले हिने नवीन घर खरेदी केलं आहे. रुपालीने गृहप्रवेश करत नवीन घराची झलक दाखवली होती. यावेळी गौरीनेही हजेरी लावली होती. रुपालीचं स्वप्न पूर्ण झालेलं पाहून गौरी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. सध्या रुपाली 'आई कुठे काय करते' मालिकेत संजनाच्या भूमिकेत आहे. गौरी कुलकर्णीलादेखील 'आई कुठे काय करते' मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत तिने गौरी हे पात्र साकारलं होतं. आता ती 'प्रेमास रंग यावे' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

Web Title: aai kuthe kay karte fame actress rupali bhosale and gauri kulkarni dance on angaron sa song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.