'आई कुठे काय करते'मधील संजनाच्या नव्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 02:56 PM2021-11-03T14:56:37+5:302021-11-03T14:57:11+5:30

नुकताच रुपाली भोसले हिने नवीन लूक केला आहे आणि हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे

'Aai Kuthe Kay Karte' fame Sanjana Aka Rupali Bhosle shared new look on Instagram | 'आई कुठे काय करते'मधील संजनाच्या नव्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती

'आई कुठे काय करते'मधील संजनाच्या नव्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'ने अल्पावधीतच रसिकांच्या मनात घर केले आहे. अनिरूद्ध, अरुंधती, संजना, आप्पा, कांचन, यश, ईशा, अभिषेक, गौरी, अनघा अशा सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेत संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले हिने साकारली आहे. रुपाली भोसले सोशल मीडियावर सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. नुकताच रुपाली भोसले हिने नवीन लूक केला आहे आणि हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या नवीन लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे. 

अभिनेत्री रुपाली भोसले हिने सोशल मीडियावर तिच्या नव्या लूकचा फोटो शेअर करत लिहिले की, कंटाळवाण्या केसांसाठी आयुष्य खूपच लहान आहे. शुभ सकाळ माझे प्रिय व्यक्ती. सेल्फी गरजेचा आहे.
रुपाली भोसले हिच्या नव्या लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे. या लूकवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. एका युजरने म्हटले की, हा लूक छान आहे पण तुम्हाला लाँग हेअर खूप छान दिसत होते. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, छान दिसते. बऱ्याच लोकांनी वॉव, छान आणि सुंदर अशा कमेंट्स केल्या आहेत. 


अभिनेत्री रुपाली भोसले हिने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच सुमीत राघवनसोबत बडी दूर से आये है या हिंदी मालिकेत देखील ती झळकली आहे. आई कुठे काय करते मालिकेत रुपालीने साकारलेल्या संजनाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. तसेच रुपाली बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. 

Web Title: 'Aai Kuthe Kay Karte' fame Sanjana Aka Rupali Bhosle shared new look on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.