'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीने केली संजना विरोधात पोलिसांत तक्रार, संजनाला होणार अटक?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 03:55 PM2022-04-16T15:55:21+5:302022-04-16T15:58:46+5:30
'आई कुठे काय करते' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. संजनाने देशमुखांचा समृद्धी बंगला स्वतःच्या नावावर केला आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या कथानकाने आणि नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. संजनाने देशमुखांचा समृद्धी बंगला स्वतःच्या नावावर केला आहे, हे समजल्यावर सर्वजण तिच्यावर नाराज झाले आहेत. यावरुन संजना आणि अनिरुद्धचं जोरदार भांडण देखील होतं. यात आता एक नवा ट्विस्ट येणार आहे.
सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होतो आहे या प्रोमोमध्ये संजना अरुंधतीवर ओरडताना दिसतेय. माझ्या घरात यायचं नाही असं सांगितलं होतं असे संजना अरुंधतीला म्हणताना दिसतेय. यावेळी संजनाचा पहिला नवरा शेखरही तिथं उपस्थित असतो. हे घरं आप्पा आणि आई कांचनचं असल्याचं सांगत. आता जो काय आरडा ओरडा करायचा आहे तो कोर्टात कर असं सांगतो. तसेच तो फ्रॉड करुन हे घर बळवळलंस म्हणून अरुंधतीने तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याचं सांगतो. हे ऐकून संजनाच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो.
दरम्यान शेखर पोलिसांनाही सोबत घेऊन आलेला असतो. त्यामुळे आता संजनाला अटक होणार का?, कि पुन्हा अनिरुद्ध तिला या सगळ्यातून वाचवणार. देशमुखांच्या घरातील मंडळी आता यावर काय भूमिका घेणार. अरुंधती संजनाने बळकावलेला देशमुखांचा बंगला कसा मिळणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.