५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 09:44 AM2024-11-01T09:44:05+5:302024-11-01T09:45:03+5:30

प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारी 'आई कुठे काय करते' ही मालिका आता ५ वर्षांनी निरोप घेत आहे.  या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेअर केली आहे. 

aai kuthe kay karte star pravah serial goes off air milind gawali shared emotional post | ५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."

५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील देशमुख कुटुंबाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यामुळे देशमुख कुटुंबातील आई, अप्पा, अरुंधती, अनिरुद्ध, अभिषेक अशी सगळीच मंडळी प्रेक्षकांना आपल्या घरातलीच वाटायची. या मालिकेतील अरुंधतीचा प्रवास प्रेक्षकांना विशेष भावला. प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारी 'आई कुठे काय करते' ही मालिका आता ५ वर्षांनी निरोप घेत आहे.  या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेअर केली आहे. 

मिलिंद गवळींची पोस्ट

मी मिलिंद गवळी, स्टार प्रवाह परिवार आणि Director's Kut Prod, कडून तुम्हा मायबाप प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना ही दीपावली सुखमय शांतीपूर्ण आरोग्यदायी यशस्वी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 

आमची "आई कुठे काय करते" ही स्टारप्रवाह वरची मालिका आपला लवकरच निरोप घेणारआहे. डिसेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२४ हा या मालिकेचा प्रवास होता. या प्रवासामध्ये दोन कोविडचे लॉकडाऊन्स...आम्ही मात्र एक महिना आधीच शूटिंगला सुरुवात आणि लॉकडाऊनच्या काळात स्टारप्रवाहने 'आई कुठे काय करते'चे भाग पुन्हा प्रक्षेपित केल्यामुळे अनेक लोक जी घरात अडकून पडली होती, त्यांनी पुन्हा सिरीयल पाहिली. ती इतकी भावली की अक्षरश: या आमच्या मालिकेला तुम्हा सर्वांनी डोक्यावर घेतलं.

आमच्यावर भरभरून प्रेम करत राहिले. आमचे निर्माते राजनजी शाही आणि स्टार प्रवाहचे मुख्य अधिकारी सतीशजी राजवाडे यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला जोमानं काम करण्यासाठी सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं. स्टार प्रवाहने आम्हाला त्यांच्या इतर कार्यक्रमांमध्ये आमंत्रण देऊन, मग ते "होऊ दे धिंगाणा" किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये आमचं कौतुक करून जाहिरात ही केली.

DKP चे विवेक भाई, आरिफ भाई रणजीत जी यांनी आम्हाला कशाचीही कमतरता पडू दिली नाही. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ठाण्यामध्ये जो समृद्धी बंगला ज्यामध्ये आम्ही शूटिंग करत होतो. त्या वास्तूमध्ये आम्ही 45 ते 50 वेगवेगळे सेट्स लावले, हॉस्पिटल्स, ऑफिसेस, रेस्टॉरंट्स, कोटरूम,पोलीस स्टेशन, वेगवेगळ्या बेडरूम्स, वेगवेगळी घरं, आश्रम, लग्नाचे हॉल, किती सांगू, आमचं आर्ट डिपार्टमेंट हे फारच म्हणजे फार भारी होतं.

त्याचबरोबर ठाण्यामध्ये आउटडोर शूटिंगला इतर शहरांमध्ये होतो तसा काही त्रास नाहीये, असंख्य रस्त्यावरचे, दुकानातले, बस स्टॉप वरचे सीन्स आम्ही प्रत्यक्ष लोकेशनवर केले. आणि पब्लिकचा कधीही त्रास झाला नाही. 

नमिता वर्तक यांची कथा पटकथा खूप भारी होती. या सिरीयलचे संवाद छान असायचे. प्रेक्षक कान देऊन ऐकायचे. ड्रेस डिपार्टमेंट एक नंबर...मेकअप डिपार्टमेंट एक नंबर, सगळेच डिपार्टमेंट भारी होते. दिग्दर्शनाचं डिपार्टमेंट सुद्धा कमाल. भट्टी जमलीच होती आणि विशेष म्हणजे कलाकार. या सिरीयलमध्ये एकापेक्षा एक कलाकार होते. आपल्या आपल्या पात्रात चपख्खल बसलेले...आप्पा, कांचनआई, अरुंधती, संजना, अभी, यश,इशा,अनघा,विमल, शेखर विशाखा आरोही गौरी, आशुतोष, नितीन, सुलेखा ताई, विद्याताई, अण्णा (जयंत सावरकर), जुनी संजना, अंकिता, अविनाश अजून खूप पाहुणे कलाकार होते. मी या सर्वांचा आभारी आहे.


मिलिंद गवळींच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. आवडती मालिका बंद होणार असल्याने चाहते भावुक झाले आहेत.  सुरुवातीला 'आई कुठे काय करते' मालिका संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होत होती. त्यानंतर मालिकेची वेळ बदलून दुपारी २.३० वाजता करण्यात आली. आता 'आई कुठे काय करते'च्या जागी 'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: aai kuthe kay karte star pravah serial goes off air milind gawali shared emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.