आमिरने चालवलाय शरीराशी खेळ!
By Admin | Published: July 2, 2017 05:10 AM2017-07-02T05:10:28+5:302017-07-02T05:10:28+5:30
आमिर खानला उगाच बॉलिवूडचा ‘परफेक्शनिस्ट’ म्हटले जात नाही. आपल्या चित्रपटासाठी तो कुठल्याही स्तरापर्यंत जाऊ शकतो. अगदी स्वत:च्या
आमिर खानला उगाच बॉलिवूडचा ‘परफेक्शनिस्ट’ म्हटले जात नाही. आपल्या चित्रपटासाठी तो कुठल्याही स्तरापर्यंत जाऊ शकतो. अगदी स्वत:च्या शरीरासोबत खेळही करू शकतो. शरीरासोबत खेळच!! ‘दंगल’ नंतर आमिरचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट येतोय. या चित्रपटातील भूमिकेत फिट बसण्यासाठी आमिरने पुन्हा एकदा आपल्या शरीराशी खेळ चालवला आहे. होय, यासाठी तो कमालीच्या वेदनेतून जातोय. या चित्रपटातील स्वत:ची व्यक्तिरेखा आमिरने अशी काही आपलीशी केली की, नाक टोचून घेतले, कान टोचून घेतले. केवळ इतकेच नाही तर शरीराचे अनेक भाग टोचवून घेतले. विशेष म्हणजे या साऱ्या गोष्टी नकली नाहीत. आमिरने खरोखरीच नाक, कान टोचून राजस्थानी स्टाईलचे दागिने परिधान केले आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी आमिरने मेहनत करुन आपले ५० किलो वजन कमी केले आहे. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या सेटवरचे आमिरचे काही फोटो व्हायरल झाले असून त्यात आमिर सडपातळ दिसत आहे. आमिरने फक्त आपले वजनच कमी केले नाही, तर पूर्णत: आपले बॉडी टाइपदेखील बदलला आहे.