बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आमिर खान आणि अक्षय कुमार, साउथचा हा चित्रपट ठरतोय वरचढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 07:21 PM2022-08-15T19:21:09+5:302022-08-15T19:21:59+5:30
आमिर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन, या दोन्ही चित्रपटांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले नाही.
२०२२ मधील बॉलिवूड चित्रपटांपेक्षा दक्षिणेतील चित्रपट आणि त्यातील आशय लोकांना अधिक आवडताना दिसत आहे. ११ ऑगस्ट रोजी बॉलिवूडच्या दोन बड्या स्टार्सचे चित्रपट प्रदर्शित झाले. आमिर खान(Aamir Khan)चा लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) आणि अक्षय कुमार(Akshay Kumar)चा रक्षाबंधन (Raksha Bandhan) हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. दुसरीकडे, कमी बजेट असलेला दाक्षिणात्य चित्रपट सीता रामम बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडत आहे.
जिथे आमिर आणि अक्षयचा चित्रपट प्रेक्षकांसाठी आसुसला आहे. त्याचबरोबर साउथ स्टार दुलकर सलमानचा चित्रपट लोकांच्या मनासह बॉक्स ऑफिसवरही कमाई करत आहे. समीक्षक आणि चित्रपट रसिकांना साउथचा हा पीरियड ड्रामा पसंतीस उतरतो आहे. आता ज्या चित्रपटाची एवढी चर्चा होत आहे त्याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.
सीता रामम हा तेलगू काळातील रोमँटिक चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन हनु राघवपुडी यांनी केले आहे. या चित्रपटात दुलकर सलमान, मृणाल ठाकूर, रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाद्वारे मृणाल ठाकूरने तेलुगुमध्ये पदार्पण केले आहे. सीता रामम मध्ये १९६४ चा काळ दाखवण्यात आला आहे. चित्रपटाची कथा आहे ती लेफ्टनंट रामची. जो लष्करी अधिकारी असून काश्मीर सीमेवर तैनात आहे. त्याला सीता महालक्ष्मीचे निनावी प्रेमपत्र मिळाले. यानंतर राम सीतेला शोधण्याच्या मोहिमेवर निघतो. तो सीतेचा शोध घेतो आणि तिला प्रपोज करू इच्छितो.
या चित्रपटात मृणालने सीतेची, तर दुलकर सलमानने राम आणि रश्मिका मंदानाने आफरीनची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे बजेट ३० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. सीता राममने पहिल्याच दिवशी जगभरात ५.२५ कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाने जगभरातील मार्केटमध्ये ५० कोटींची कमाई केली आहे.