‘Laal Singh Chaddha’साठी आमिर, करिनाने घेतलं तगडं मानधन; वाचा इतर कलाकारांची फी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 08:00 AM2022-04-28T08:00:00+5:302022-04-28T08:00:01+5:30

Laal Singh Chaddha Star Cast Fee: ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात आमिरसोबत करिना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे. साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय.

Aamir Khan and Kareena Kapoor Khan Laal Singh Chaddha fees charged by the cast | ‘Laal Singh Chaddha’साठी आमिर, करिनाने घेतलं तगडं मानधन; वाचा इतर कलाकारांची फी

‘Laal Singh Chaddha’साठी आमिर, करिनाने घेतलं तगडं मानधन; वाचा इतर कलाकारांची फी

googlenewsNext

Laal Singh Chaddha Star Cast Fee: बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा ( Aamir Khan ) ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा सिनेमा दीर्घकाळापासून चचर्चेत आहे. याचवर्षी 11 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे. साहजिकच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाच्या बजेटबद्दल अद्याप फार काही माहिती समोर आलेली नाही. पण हो, या चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाची माहिती मात्र समोर आली आहे. 

आमिर खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी आमिरने किती मानधन घेतलं माहितीये? तर 50 कोटी रूपये. या चित्रपटाचा बजेट केवळ 180 कोटी रूपये आहे आणि 50 कोटी तर नुसते आमिरच्या वाट्याला गेले आहेत.

आमिरसोबत या चित्रपटात करिना कपूर (Kareena Kapoor Khan) लीड रोलमध्ये आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी करिनाने 8 कोटी रूपये मानधन घेतलं आहे.
साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय. या चित्रपटासाठी त्याने 6 कोटी फी घेतल्याची माहिती आहे.
थ्री इडियट्स या चित्रपटात आमिर खानसोबत झळकलेली अभिनेत्री मोना सिंग हिची या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटासाठी तिने 2 कोटी फी घेतली आहे. अभिनेता मानव विज याने या चित्रपटासाठी 1 कोटी घेतल्याचं कळतंय.

या चित्रपटाचे चित्रीकरण पंजाब, हिमाचल प्रदेश, लडाख आणि तुर्की येथे झालंआहे.  लाल सिंह चड्ढा हा टॉम हँक्स आणि रॉबिन राइट  यांच्या ‘फॉरेस्ट गंप’ या हिट चित्रपटाचा रिमेक आहे. आमिर खान, किरण राव  आणि वायकॉम 18 स्टूडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Web Title: Aamir Khan and Kareena Kapoor Khan Laal Singh Chaddha fees charged by the cast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.