करण जोहरने भरपार्टीत माझा अपमान केला...! आमिर खानचा भाऊ फैजलचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 10:04 AM2020-09-08T10:04:15+5:302020-09-08T10:05:14+5:30

आमिरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत करण जोहरने सर्वांसमोर आपला अपमान केल्याचा आरोप करत फैजलने एक किस्सा शेअर केला आहे.

aamir khan brother faisal khan says karan johar insulted me in a party | करण जोहरने भरपार्टीत माझा अपमान केला...! आमिर खानचा भाऊ फैजलचा आरोप

करण जोहरने भरपार्टीत माझा अपमान केला...! आमिर खानचा भाऊ फैजलचा आरोप

googlenewsNext
ठळक मुद्दे‘प्यार का मौसम’ या चित्रपटात फैजलने शशी कपूर यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. यानंतर विक्रम भट्ट यांच्या ‘मदहोश’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिदीर्ची सुरुवात केली होती.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणानंतर बॉलिवूडमधील नेपोटिजमचा मुद्दा तापला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर कंगना राणौतने नेपोटिजमचा मुद्दा लावून धरत करण जोहरवर जोरदार निशाणा साधला होता. आता  आमिर खानचा भाऊ फैजल खान यानेही करण जोहरबद्दल एक खळबळजनक खुलासा केला आहे. आमिरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत करण जोहरने सर्वांसमोर आपला अपमान केल्याचा आरोप करत फैजलने एक किस्सा शेअर केला आहे.
तुमचे काम फ्लॉप असेल तर करण जोहर तुम्हाला जराही भाव देत नाही. तो तुमच्याकडे बघत सुद्धा नाही. माझ्यासोबत हे सगळे घडले आहे, असे फैजलने सांगितले.

बॉलिवूड हंगाला दिलेल्या मुलाखतीत फैजल म्हणाला, माझ्या भावाचा (आमिर खान) 50 वा वाढदिवस होता. भावाच्या वाढदिवसाच्या पार्टीतच करण जोहरने माझा सर्वांसमोर अपमान केला. मी एका दुस-या व्यक्तिसोबत बोलत होतो आणि करण मला त्या व्यक्तिसोबत बोलण्यापासून रोखत होता. करण मात्र त्या व्यक्तिसोबत बोलत होता. त्या व्यक्तिला माझ्यापासून दूर देण्याचा प्रयत्न करणने केला. त्याची ती वागणूक प्रचंड अपमानास्पद होती, असे फैजलने सांगितले.

‘प्यार का मौसम’ या चित्रपटात फैजलने शशी कपूर यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. यानंतर विक्रम भट्ट यांच्या ‘मदहोश’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिदीर्ची सुरुवात केली होती. ‘मदहोश’नंतर फैजलने पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि यानंतर २००० मध्ये ‘मेला’ या चित्रपटातून वापसी करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात फैजल भाऊ आमिरसोबत दिसला होता. हा चित्रपट फ्लॉप झाला. पण या चित्रपटाने फैजलला खरी ओळख दिली. अर्थात ही ओळख फैजलला फार काळ टिकवता आली नाही.
२००७ मध्ये फैजल घरातून पळून गेल्याची खबर होती. काही दिवसानंतर तो सिजोफ्रीनिया नामक आजाराने पीडित असल्याची बातमी आली. केवळ इतकेच नाही तर आमिरने मला घरात कैद करून ठेवले आहे, असा आरोप करून फैजलने याकाळात खळबळ निर्माण केली. आमिर माझी संपत्ती हडपू इच्छितो, असेही त्याने म्हटले होते.

Web Title: aamir khan brother faisal khan says karan johar insulted me in a party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.