"थोडी लाज बाळगा..!", वर्कआउटदरम्यान फियॉन्सेला सारखं सारखं किस केल्यामुळे आमिर खानची लेक झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 05:43 PM2023-09-26T17:43:27+5:302023-09-26T17:44:56+5:30

Ira Khan : आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच नुपूर शिखरेसोबत तिची एंगेजमेंट झाली. ती आणि नुपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघे अनेकदा एकमेकांसोबत क्वालिटी टाइम व्यतित करताना दिसतात.

aamir khan daughter ira khan trolled for kissing again and again fiance nupur shikhare said be little ashamed | "थोडी लाज बाळगा..!", वर्कआउटदरम्यान फियॉन्सेला सारखं सारखं किस केल्यामुळे आमिर खानची लेक झाली ट्रोल

"थोडी लाज बाळगा..!", वर्कआउटदरम्यान फियॉन्सेला सारखं सारखं किस केल्यामुळे आमिर खानची लेक झाली ट्रोल

googlenewsNext

आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच नुपूर शिखरेसोबत तिची एंगेजमेंट झाली. ती आणि नुपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघे अनेकदा एकमेकांसोबत क्वालिटी टाइम व्यतित करताना दिसतात. आयरा आणि नुपूर दररोज त्यांच्या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

अलीकडेच आयरा खानने एक पोस्ट केली ज्यामध्ये तिने तिच्या भूतकाळातील काही खास क्षणांचे व्हिडिओ शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले - 'आठवणींच्या रस्त्यावरून प्रवास.' यातील पहिल्या व्हिडिओमध्ये आयरा तिचा फियॉन्से नुपूर शिखरेसोबत वर्कआउट करताना दिसत आहे. वर्कआउट दरम्यान आयरा नुपूरसोबत वारंवार लिप-लॉक करताना दिसली, ज्यामुळे ती ट्रोल झाली.

आयरा खानला तिच्या फियॉन्सेला वारंवार किस करताना पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल केले. एका यूजरने लिहिले की, दोघांचे लग्न झालेले नाही, त्यांची फक्त एंगेजमेंट झाली आहे. दोघेही वेडे दिसतात. ते पती-पत्नी असल्यासारखे जगतात. दुसर्‍या व्यक्तीने कमेंट केली की, थोडी लाज बाळगा मॅडम.

आयरा ३ जानेवारीला करणार कोर्ट मॅरेज!
आयरा आणि नुपूर यांची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट झाली होती. त्यांच्या एंगेजमेंटला बॉलिवूड जगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता बातमी आहे की, आयरा मंगेतर नुपूर शिखरेसोबत लवकरच लग्न करणार आहे. ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, आयरा खान नुपूर शिखरेसोबत ३ जानेवारीला कोर्ट मॅरेज करणार आहे. त्यानंतर ते राजस्थानच्या उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न करणार आहेत. लग्नाला फक्त त्याचे मित्र आणि कुटुंबीयच उपस्थित राहणार आहेत.
 

Web Title: aamir khan daughter ira khan trolled for kissing again and again fiance nupur shikhare said be little ashamed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.