Laal Singh Chaddha : ‘लाल सिंग चड्ढा’वर का भडकले लोक? सोशल मीडियावर का होतोय आमिर-करिनाला विरोध?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 12:17 PM2022-08-01T12:17:04+5:302022-08-01T12:17:45+5:30

Laal Singh Chaddha : होय, सोशल मीडियावर  ‘बायकॉट लाल सिंग चड्ढा’ ट्रेंड होतंय. ‘लाल सिंग चड्ढा’ येत्या 11 ऑगस्टला चित्रपटगृहांत धडकणार आहे. त्याआधी सोशल मीडियावर या चित्रपटाला विरोध होताना दिसतोय.

Aamir Khan film Laal Singh Chaddha boycott trends netizens upset | Laal Singh Chaddha : ‘लाल सिंग चड्ढा’वर का भडकले लोक? सोशल मीडियावर का होतोय आमिर-करिनाला विरोध?

Laal Singh Chaddha : ‘लाल सिंग चड्ढा’वर का भडकले लोक? सोशल मीडियावर का होतोय आमिर-करिनाला विरोध?

googlenewsNext

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सुमारे चार वर्षांच्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर परततो आहे. आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. काही वर्षांआधी आमिरचा सिनेमा येणार म्हटल्यावर, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचायची. सगळीकडे त्याच्याच सिनेमाची चर्चा व्हायची. पण ‘लाल सिंग चड्ढा’च्या बाबतीत मात्र चित्र उलटं दिसू लागलंय. होय, सोशल मीडियावर  ‘बायकॉट लाल सिंग चड्ढा’ ट्रेंड होतंय. वाचून धक्का बसेल, पण हे खरं आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ येत्या 11 ऑगस्टला चित्रपटगृहांत धडकणार आहे. त्याआधी सोशल मीडियावर या चित्रपटाला विरोध होताना दिसतोय.

ट्विटरवर या #BoycottLaalSinghChaddha ट्रेंड होत आहे. चाहते आमिरवर का नाराज आहेत? त्याच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी का होतेय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर  आमिर आणि करिना कपूरच्या जुन्या वक्तव्यांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे.

का नाराज आहेत युजर्स?
भारतात राहणं सुरक्षित नाही, असं तुझी पत्नी म्हणाली होती. मग तू भारतात तुझा चित्रपट का रिलीज करतोय? अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. अन्य एका युजरने आमिरचा सिनेमा न पाहण्याचं आवाहन केलं आहे.

या नेपो किड्स, ड्रग्ज घेणाऱ्या, माफियांना बायकॉट करण्याची वेळ आली आहे. आपले पैसे यांचे चित्रपट पाहण्यावर खर्च करू नका तर गरजवंताना द्या, अशी कमेंट एका युजरने केली आहे. काही वर्षांआधी आमिरने शिवलिंगावर दूध चढवणं मूर्खपणाचं असल्याचं म्हटलं होतं. काही युजर्सनी त्याची आठवण करून देत, आमिरच्या सिनेमाला विरोध केला आहे.

करिनाचाही विरोध होतो. आमचे सिनेमे पाहायचे नसतील तर नका पाहू, तुम्हाला कुणी बळजबरी करत नाहीये, असं कधीतरी करिना म्हणाली होती. युजर्सने त्याची आठवण करून देत, ‘लाल सिंग चड्ढा’ला विरोध चालवला आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ पाहण्यापेक्षा ओरिजनल ‘फारेस्ट गंप’ पाहणं चांगलं, अशा कमेंट्सही ट्विटरवर पाहायला मिळत आहेत.

‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा अद्वैत चंदनने दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात आमिरसोबत करिना कपूर लीड रोलमध्ये आहे. बॉक्स ऑफिसवर ‘लाल सिंग चड्ढा’सोबत अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ रिलीज होतोय. या दोन्ही चित्रपटाचा क्लॅश यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे.

Web Title: Aamir Khan film Laal Singh Chaddha boycott trends netizens upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.