आमिरने शब्द पाळला नाहीच, शेवटी फोन घेणेही बंद केले..., अभिनेत्याच्या मृत्यूनंतर भावाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 05:45 PM2021-08-11T17:45:56+5:302021-08-11T17:47:00+5:30

दिग्गज अभिनेते अनुपम श्याम यांचे गत रविवारी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

Aamir Khan had assured a dialysis centre for Anupam Shyam but stopped picking calls later, claims brother | आमिरने शब्द पाळला नाहीच, शेवटी फोन घेणेही बंद केले..., अभिनेत्याच्या मृत्यूनंतर भावाचा खुलासा

आमिरने शब्द पाळला नाहीच, शेवटी फोन घेणेही बंद केले..., अभिनेत्याच्या मृत्यूनंतर भावाचा खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्देअनुपम श्याम यांना मन की आवाज प्रतिज्ञा या टीव्ही मालिकेत साकारलेल्या भूमिकेने  खरी लोकप्रियता मिळवून दिली होती. यामध्ये त्यांनी ठाकूर सज्जन सिंहची भूमिका साकारली होती.

दिग्गज अभिनेते अनुपम श्याम ( Anupam Shyam ) यांचे गत रविवारी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ते किडणीच्या आजाराने ग्रस्त होते. या आजारासोबत आर्थिक संकटाचा सामनाही करत होते. अनुपम यांचा भाऊ अनुराग श्याम यांनी त्यांच्यासाठी मदतीचे आवाहन केले होते. अनेक कलाकारांनी मदतीचा हातही पुढे केला होता.   बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) यानेही अनुपम यांना डायलिसिस सेंटर उभारण्याचा शब्द दिला होता. पण प्रत्यक्षात त्याने हा शब्द पाळला नाही. अनुपम यांचा भाऊ अनुराग यांनी खुद्द हा दावा केला आहे.
नुकतीच अनुपम श्याम यांचा भाऊ अनुराग श्याम यांनी ‘आजतक’ला मुलाखत दिली. 

ते म्हणाले, ‘आमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गेल्याच महिन्यात आई गेली. तिच्या अंत्यदर्शनाला अनुपम प्रतापगडला जाऊ शकला नव्हता. यामुळे तो दु:खी होता.  प्रतापगडमध्ये डायलिसिस सेंटर नाही, त्यामुळे अनुपमला तेथे नेणे धोकादायक होते. प्रतापगडमध्ये डायलिसीस सेंटर उघडावे, यासाठी अनुपमने खूप प्रयत्न केले होते. अगदी यासाठी तो आमिर खानला सुद्धा भेटला होता. आमिरने त्याला आश्वासनही दिले होते. पण प्रत्यक्षात आमिरने काहीच केले नाही. अनुपमची ही अखेरची इच्छा तो हयात असेपर्यंत पूर्ण झाली नाही. आमिरने नंतर आमचे फोन उचलणेही बंद केले.’

अनुपम श्याम यांना मन की आवाज प्रतिज्ञा या टीव्ही मालिकेत साकारलेल्या भूमिकेने  खरी लोकप्रियता मिळवून दिली होती. यामध्ये त्यांनी ठाकूर सज्जन सिंहची भूमिका साकारली होती. ते ख-या आयुष्यातही याच नावाने ओळखले जातात.  सदरादी बेगम, बँडिट क्वीन, हजार चौरासी की माँ,  दुश्मन,  सत्या,  दिल से, जख्म, प्यार तो होना ही था,  कच्चे धागे, नायक,  स्लमडॉग मिलेनियर  आणि मुन्ना सायकल सारख्या सिनेमात त्यांनी काम केले होते.

Web Title: Aamir Khan had assured a dialysis centre for Anupam Shyam but stopped picking calls later, claims brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.