आमिर खान मायानगरी मुंबईला रामराम करणार?, या कारणामुळे अभिनेत्याला घ्यावा लागला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 08:54 AM2023-10-21T08:54:29+5:302023-10-21T09:09:17+5:30

आमिर मायानगरी मुंबईला रामराम करणार असल्याचं बोललं जातंय.

Aamir khan is leaving mumbai and will shift to chennai for 2 months for his mother treatment | आमिर खान मायानगरी मुंबईला रामराम करणार?, या कारणामुळे अभिनेत्याला घ्यावा लागला निर्णय

आमिर खान मायानगरी मुंबईला रामराम करणार?, या कारणामुळे अभिनेत्याला घ्यावा लागला निर्णय

आमिर खानसाठी हे वर्ष फारसं चांगलं ठरलं नाही. त्याचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप  झाला. सुमारे 180 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आपला खर्चही वसूल करू शकला नाही. 'लाल सिंह चड्ढा'चं अपयश आमिर खानच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. आता आमिर खान संदर्भात आणखी एक बातमी समोर येते आहे. आमिर मायानगरी 
 मुंबईला रामराम करणार असल्याचं बोललं जातंय. तो चेन्नईला शिफ्ट होणार होणार आहे. मुंबई शहर कायमचा सोडणार नाही, तर दोन महिन्यांसाठीच तो चेन्नईला जाणार आहे. त्यामागचे कारण म्हणजे त्याची आई झीनत हुसैन.

आमिर खान काही काळ चेन्नईमध्येच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे, कारण त्याची आई झीनत हुसैन यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. आमिर खान आईच्या फारजवळ आहे आणि उपचारादरम्यान त्याला तिच्यासोबत राहायचे आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आमिर आईच्या ट्रिटमेंट सेंटरच्या जवळच्या हॉटेलमध्ये राहणार आहे. यामागचं कारण म्हणजे जेव्हा आईला त्याची गरज लागेल तेव्हा तो लगेच जाऊ शकेल. आमिर गेल्या काही काळापासून कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.

अलीकडेच एका कार्यक्रमात आमिर खान म्हणाला होता की, अभिनय आणि चित्रपट निर्मितीसोबतच त्याला आपल्या कुटुंबालाही वेळ द्यायचा आहे. कामामुळे त्याने आपल्या कुटुंबाला आणि मुलांना जास्त वेळ दिला नाही याची खंत असल्याचे आमिरने म्हटले होते. आता तो आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. आमिरने चित्रपटांमधून ब्रेक घेतला आहे आणि अधिकाधिक वेळ तो कुटुंबासोबत घालवत आहे.

Web Title: Aamir khan is leaving mumbai and will shift to chennai for 2 months for his mother treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.