VIDEO: -तर मग घटस्फोट का घेतला? आमिर खान व किरण रावचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 12:41 PM2022-05-26T12:41:19+5:302022-05-26T12:42:17+5:30
Aamir Khan-Kiran Rao : घटस्फोटाच्या घोषणेनंतरही आमिर व किरण अनेकदा एकत्र दिसले आणि दरवेळी ट्रोल झाले. काल रात्रीही करण जोहरच्या बर्थ डे पार्टीत दोघांनी एकत्र हजेरी लावली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि आमिर- किरण पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेत.
Aamir Khan-Kiran Rao : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) यांनी गतवर्षी घटस्फोटाची घोषणा केली होती. दोघांनीही एक पोस्ट शेअर करत आपण घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. घटस्फोटाच्या घोषणेनंतरही आमिर व किरण अनेकदा एकत्र दिसले आणि दरवेळी ट्रोल झाले. काल रात्रीही करण जोहरच्या बर्थ डे पार्टीत (Karan Johar's 50th Birthday Party) दोघांनी एकत्र हजेरी लावली. इतकंच नाही तर कपलसारख्या पोझही दिल्या. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि आमिर व किरण दोघंही पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेत.
व्हिडीओत आमिर व किरण दोघंही एकत्र एन्ट्री घेताना दिसतात. फोटोग्राफर्स त्यांना पोझ देण्याची विनंती करतात आणि दोघंही कपलसारखे पोझ देतात. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि नेटकरी भडकले. घटस्फोटानंतरही दोघांनाही एखाद्या जोडप्यासारखं वावरताना पाहून अनेकांनी आमिर-किरणला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या. ‘आधी या लोकांना लग्न म्हणजे खेळ वाटायला, आता घटस्फोटही यांना खेळ वाटू लागला आहे,’ अशी कमेंट एकाने केली. ‘कपलसारखं एकत्र राहायचंच होतं तर घटस्फोट का घेतला?,’असा संतप्त सवाल एका युजरने केला. ‘हे बॉलिवूडचे लोक काहीही करू शकतात,’ अशी प्रतिक्रिया अन्य एका युजरने दिली. ‘रिनाला का सोडलं? तिलाही सोबत घेऊन फिरायचं ना,’ अशी खोचक कमेंट अन्य एकाने केली. ‘या माणसाचं काहीही कळत नाही,’ अशी कमेंट एका युजरने केली.
काहींनी मात्र आमिर व किरणचा बचावही केला. ‘घटस्फोट झाला असला तरी ते दोघं अजूनही एकमेकांचे मित्र आहेत आणि याला मॅच्युरिटी म्हणतात,’ अशा शब्दांत एका नेटकऱ्याने आमिर व किरणचं समर्थन केलं.
2005 मध्ये आमिर खाननेकिरण रावशी लग्न केलं होतं. त्याआधी आमिरने रिना दत्तासोबत लग्न झालं होतं. पण 16 वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतला होता. अलीकडे लेकीच्या बर्थ डे पार्टीत आमिर व रिना एकत्र दिसले होते.