बाबो! ‘लाल सिंग चड्ढा’ ठरला यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट..., हे कसं शक्य झालं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 11:50 AM2022-08-24T11:50:26+5:302022-08-24T11:52:29+5:30
Aamir Khan Laal Singh Chaddha : होय, इंडियन बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरलेल्या आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ याच चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. धक्का बसला ना? पण हे खरं आहे.
LSC WorldWide Box Office: आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ ( Laal Singh Chaddha) भारतीय बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. अगदी 13 दिवसांतच या चित्रपटाची कमाई गडगडली. आमिर खानसारख्या सुपरस्टारच्या सिनेमाची ही गत झालेली पाहून बॉलिवूडचं टेन्शन वाढलं नसेल तर नवल. पण आता चिंता नाही. होय, इंडियन बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरलेल्या आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ याच चित्रपटाने एक विक्रम नोंदवला आहे. धक्का बसला ना? पण हे खरं आहे. इंटरनॅशनल बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.अगदी गंगूबाई काठियावाडी, भुल भुलैय्या 2 आणि द काश्मीर फाइल्स सारख्या हिट चित्रपटांनाही ‘लाल सिंग चड्ढा’ने मागे टाकलं आहे. आमिरचा सिनेमा 2022 या वर्षांतील इंटरनॅशनल मार्केटमधील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला आहे.
विदेशात किती केली कमाई?
‘लाल सिंग चड्ढा’ भारतात ‘बायकॉट ट्रेंड’चा बळी ठरला. पण विदेशात या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, विदेशी मार्केटमध्ये ‘लाल सिंग चड्ढा’ ने दुसऱ्या आठवड्याच्या अखेरपर्यंत 7.5 मिलियन डॉलर म्हणजेच 60 कोटींची कमाई केली. याचसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ ने गंगूबाई काठिायावाडी (7.47 मिलियन डॉलर), भुल भुलैय्या 2 (5.88 मिलियन डॉलर), द काश्मीर फाइल्स (5.7 मिलियन डॉलर)ला मागे टाकलं आहे.
भारतात 13 दिवसांत कमावले इतके कोटी
‘लाल सिंग चड्ढा’ने भारतात गेल्या 13 दिवसांत 57 कोटींची कमाई केली आहे. आमिरच्या वर्ल्डवाईड कमाईबद्दल बोलायचं तर या चित्रपटाने 126 कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ चा बजेट 180 कोटींच्या घरात होता. त्यामुळे हळूहळू का होईना आमिरचा चित्रपट बजेट वसूल करू शकतो. लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ चीनमध्ये रिलीज होणार आहे. चीनमध्ये आमिरची मोठी फॅन फॉलोइंग आहे. आमिरचा प्रत्येक सिनेमा चीनमध्ये तुफान कमाई करतो. त्यामुळे चीनी प्रेक्षकांकडूनही ‘लाल सिंग चड्ढा’ला मोठ्या अपेक्षा आहेत.