या सिनेमाच्या शूटिंगसाठी गाजियाबादमध्ये पोहोचला आमिर खान, कुणाला कोनाकान नाही झाली खबर

By गीतांजली | Published: October 29, 2020 01:59 PM2020-10-29T13:59:09+5:302020-10-29T14:03:52+5:30

बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याचा आगामी सिनेमा 'लाल सिंग चड्ढा'ला घेऊन चर्चेत आहे.

Aamir khan reach ghaziabad for lal singh chaddha movie shooting | या सिनेमाच्या शूटिंगसाठी गाजियाबादमध्ये पोहोचला आमिर खान, कुणाला कोनाकान नाही झाली खबर

या सिनेमाच्या शूटिंगसाठी गाजियाबादमध्ये पोहोचला आमिर खान, कुणाला कोनाकान नाही झाली खबर

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याचा आगामी सिनेमा 'लाल सिंग चड्ढा'ला घेऊन चर्चेत आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी तो बुधवारी गाजियाबादमध्ये पोहोचला होता. मात्र या गोष्टीची कुणाला कानोकान खबर नाही झाली.  बुधवारी आमिर खान ट्रॉनिका सिटी येथील रूपाच्या एका कंपनीत 'लाल सिंग चड्ढा'च्या शूटिंगसाठी पोहोचला. इथं जवळपास अर्धातास शूटिंग करुन तो निघाला. त्याची गाडी थेट कंपनीत आली आणि निघून गेली.

शूटिंगच्या वेळी कंपनीच्या आत व बाहेरची सुरक्षा व्यवस्था कडक होती. शूटिंग दरम्यान कुणालाच कंपनीत प्रवेश करण्यास किंवा बाहेर जाण्यास मनाई होती.कंपनीतल्या लोकांच्या विनंतीवरुन आमिरने काही फोटो काढले. 

लाल सिंग चड्ढा चित्रपटाची टीम शूटिंगदरम्यान आवश्यक ती काळजी घेत आहेत. हा चित्रपट टॉम हँक्सचा फॉरेस्ट गम्पपासून प्रेरीत होऊन बनवले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहे. या चित्रपटात करीना कपूर खान आणि आमिर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  'लाल सिंग चड्ढा’ आहे हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल. आधी हा सिनेमा ख्रिसमसला रिलीज होणार होता मात्र कोरोना व्हायरसमुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. २०२१ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Aamir khan reach ghaziabad for lal singh chaddha movie shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.