'गजनी'साठी आमिर खानला नव्हती पहिली पसंती, या सुपरस्टारची झालेली निवड पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 06:59 PM2024-10-01T18:59:17+5:302024-10-01T19:01:34+5:30

Gajini Movie Aamir Khan : 'गजनी'मध्ये आमिर खानने अतिशय दमदार व्यक्तिरेखा साकारली होती. ज्याद्वारे त्याने चाहत्यांच्या मनावर छाप उमटविली. पण तुम्हाला माहित आहे का की या चित्रपटासाठी आमिर निर्मात्यांची पहिली पसंती नव्हता.

Aamir Khan was not the first choice for 'Ghajni', but the choice of this superstar... | 'गजनी'साठी आमिर खानला नव्हती पहिली पसंती, या सुपरस्टारची झालेली निवड पण...

'गजनी'साठी आमिर खानला नव्हती पहिली पसंती, या सुपरस्टारची झालेली निवड पण...

आमिर खान(Aamir Khan)ने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. २००८ साली प्रदर्शित झालेला 'गजनी' (Gajini Movie) हाही असाच एक अविस्मरणीय चित्रपट आहे जो आजही प्रेक्षकांना आवडतो. या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये ३०० कोटींचा हिट क्लबही सुरू केला. आमिरच्या या सुपरहिट चित्रपटाची एक मनोरंजक गोष्ट म्हणजे तो या चित्रपटासाठी दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हता. वास्तविक, चित्रपटाचे दिग्दर्शक मुरुगदास यांना गजनीमध्ये मुख्य भूमिकेसाठी सलमान खानला कास्ट करायचे होते. पण हे पात्र आमिरला कसे मिळाले ही एक रंजक कहाणी आहे.

मुरुगदास यांचा चित्रपट 'गजनी' हा याच नावाच्या २००५ साली रिलीज झालेल्या साऊथ चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटाचे दिग्दर्शनही मुरुगदास यांनी केले होते. त्यांना त्याची हिंदी आवृत्तीही तयार करायची होती, म्हणून ते बॉलिवूडकडे वळले. या चित्रपटात सलमान खानने यावे अशी मुरुगदास यांची इच्छा होती पण चित्रपटात खलनायकाची भूमिका करणाऱ्या प्रदीप रावतच्या सल्ल्यामुळे त्यांचा विचार बदलला. खरेतर, चित्रपटासंदर्भात एका मुलाखतीदरम्यान, प्रदीप रावतने स्वत: सांगितले होते की, मुरुगदास सलमान खानला कास्ट करण्यासाठी खूप उत्सुक होते. या ॲक्शन पॅक्ड कॅरेक्टरसाठी सलमान खानच सर्वोत्तम पर्याय असेल असा विश्वास होता. पण सलमान खानचा रागीट स्वभाव चित्रपटाच्या निर्मितीमध्ये अडचणीचा ठरू शकतो असे मला वाटले.

अशी झाली आमिर खानची निवड

प्रदीप रावत म्हणाला की, 'मुरुगदास यांना याआधी हिंदी चित्रपट करण्याचा अनुभव नव्हता. मुरुगदास यांना ना हिंदी बोलता येत होते नाही इंग्रजी. अशा परिस्थितीत जर सलमान खान चित्रपटाचा भाग असेल तर कम्युनिकेशन गॅपमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, अशी भीती मला वाटत होती. खरे तर प्रदीपने याआधी सरफरोश चित्रपटात काम केले होते आणि आमिरचा शांत स्वभाव त्याला माहीत होता. हा शांत स्वभाव संवादाचा प्रश्न सोडवू शकत होता. 

आमिर खानला मनवायला लागले सहा महिने

प्रदीप रावत म्हणाला की, 'मी मुरुगदासला संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली आणि आमिर कसा व्यावसायिक अभिनेता आहे हे सांगितले. मी त्याला कधीही कोणावर रागावलेले किंवा वाईट वागताना पाहिले नाही. मात्र, आमिर खानला मनवायला सहा महिने लागले. त्याने चित्रपटाची स्क्रिप्ट पाहिली आणि ते करण्यास होकार दिला.
एआर मुरुगदासचा 'गजनी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तर बंपर हिट ठरलाच पण ३०० कोटींहून जास्त व्यवसाय केला. या चित्रपटात असिन आमिर खानसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती.
 

Web Title: Aamir Khan was not the first choice for 'Ghajni', but the choice of this superstar...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.