‘नच बलिये’साठी आमीर खानने बबिता फोगटला दिल्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 05:16 PM2019-07-24T17:16:39+5:302019-07-24T17:19:47+5:30

या सेलिब्रिटी जोड्यांच्या नृत्यकौशल्यावर आधारित कार्यक्रमात बबिता फोगट प्रियकर विवेक सुहागसह सहभागी झाली आहे.

Aamir Khan wished Babita Phogat and fiance Vivek Suhag for Nach Baliye 9. | ‘नच बलिये’साठी आमीर खानने बबिता फोगटला दिल्या शुभेच्छा!

‘नच बलिये’साठी आमीर खानने बबिता फोगटला दिल्या शुभेच्छा!

googlenewsNext


'नच बलिये' या डान्स रियालिटी शो ने सुरुवातीपासूनच रसिकांची मने जिंकलीत.... या डान्सच्या महा मुकाबल्यात सामील होणाऱ्या सेलिब्रिटीमुळे शो ची उत्कंठा चांगलीच वाढली आहे. एकापेक्षा एक असलेल्या या सेलिब्रिटीच्या या डान्स युद्धामुळे नच बलिये ने रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलं. ‘नच बलिये-9’  सीझनची रसिक आतुरतेने वाट पाहतायत. इतर सीझनप्रमाणे यंदाचा सिझनमध्ये काय होणार याची उत्सुकता साऱ्यांना आहे. यावेळीही नच ने रसिकांना निराश केले नाही. या डान्सच्या महामुकाबल्यात सामील होण्यासाठी बबिता फोगटही सज्ज झाली आहे.


या सेलिब्रिटी जोड्यांच्या नृत्यकौशल्यावर आधारित कार्यक्रमात बबिता फोगट प्रियकर विवेक सुहागसह सहभागी झाली आहे. बॉलीवूडचा सुपरस्टार आमीर खानने तिच्या कारकीर्दीवर आधारित ‘दंगल’ हा चित्रपट तयार केला होता. आता बबिता फोगट या कार्यक्रमात सहभागी होत असल्याचे समजताच त्याने तिला डान्सच्या कुरुक्षेत्रात भिडण्यासाठी  शुभेच्छा दिल्या आहेत. 

शेअर केलेल्या  व्हिडिओमध्ये आमीर खान बबिताला शुभेच्छा देताना दिसतो. ती जी गोष्ट हाती घेते, त्यात तिला यश मिळतेच. असे त्याने यावेळी म्हटले आहे. तसेच जर अन्य खेळाडू तिच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसले, तर तिने आपला प्रसिध्द ‘धोबी पछाड’ हा डावपेच वापरून त्यांना चितपट करावे, अशी मिस्किल सूचनाही त्याने या व्हिडिओत केली आहे.


सेलिब्रिटी जोड्या डान्सच्या महायुद्धात उतारणार म्हटल्यावर 'नच बलिये' डान्सचे कुरुक्षेत्र पाहण्यासाठी रसिकांमध्येही कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.


Web Title: Aamir Khan wished Babita Phogat and fiance Vivek Suhag for Nach Baliye 9.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.