प्रेक्षकच रूसले, बॉलिवूडची बत्ती गुल! 6 दिवसांत ‘लाल सिंग चड्ढा’, ‘रक्षाबंधन’चे 30 टक्के शो रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 11:12 AM2022-08-17T11:12:45+5:302022-08-17T11:27:21+5:30
Bollywood in Trouble ! 2022 या वर्षात एकापाठोपाठ एक सिनेमे दणकून आपटत आहे. काय खान, काय कुमार... कुणाच्याच चित्रपटांकडे प्रेक्षक फिरकेनासे झाले आहेत.
आधी आमिर खान, अक्षय कुमारसारख्या सुपरस्टारचे सिनेमे रिलीज होणार म्हटल्यावर प्रेक्षकांच्या उड्या पडायच्या. तिकिटासाठी पहाटेपासून रांगा रागायच्या. फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहण्यासाठी चाहते तुटून पडायचे. पण आता चित्र बदललं आहे. 2022 या वर्षात एकापाठोपाठ एक सिनेमे दणकून आपटत आहे. काय खान, काय कुमार... कुणाच्याच चित्रपटांकडे प्रेक्षक फिरकेनासे झाले आहेत.
गेल्या 11 ऑगस्टला आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha)आणि अक्षय कुमारचा ( Akshay Kumar ) ‘रक्षाबंधन’ (RakshaBandhan )असे दोन मोठे सिनेमे रिलीज झालेत. या दोन्ही सिनेमांचं जबरदस्त प्रमोशन झालं. पण रिलीजनंतर या दोन्ही सिनेमांचे शो रद्द करण्याची वेळ आली आहे. आमिर व अक्षय हे बॉलिवूड इंडस्ट्रीचे मोठे स्टार आहेत. त्यांचे सिनेमे 200-300 कोटी सहज कमावतात. ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ या दोन्ही सिनेमांकडून हीच अपेक्षा होती. पण दुर्दैवाने प्रेक्षकांनी या चित्रपटांकडे पाठ फिरवली. 5 दिवसांचा इतका मोठा वीकेंड मिळूनही या चित्रपटांचा त्याचा काहीही फायदा झाला नाही. चित्रपटगृहे ओस पडल्यामुळे ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’चे शो रद्द करावे लागत आहेत.
बॉलिवूड हंगामाने एक्झीबिटर्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’चे सकाळ व दुपारे सुमारे 30 टक्के शो रद्द करावे लागले. चित्रपटाला प्रेक्षकचं नसल्यामुळे ही वेळ ओढवली. जाणकारांनी याला डार्क ब्लॅक वीकेंड म्हटलं आहे.
#LaalSinghChaddha is rejected... #LSC *5-day* total is lower than *Day 1* total of #ThugsOfHindostan [₹ 50.75 cr; #Hindi version], do the math... Thu 11.70 cr [#RakshaBandhan], Fri 7.26 cr, Sat 9 cr, Sun 10 cr, Mon 7.87 cr [#IndependenceDay]. Total: ₹ 45.83 cr. #India biz. pic.twitter.com/b8myhVtaAF
— taran adarsh (@taran_adarsh) August 16, 2022
6 दिवसांत किती केली कमाई?
गेल्या शुक्रवारी ‘लाल सिंग चड्ढा’चे 1300 आणि ‘रक्षाबंधन’चे 1000 शो रद्द करण्यात आले होते. काल मंगळवारीही हेच चित्र दिसलं. ‘लाल सिंग चड्ढा’ने गेल्या 5 दिवसांत केवळ 45.83 कोटींचा बिझनेस केला आहे. अक्षय कुमारच्या सिनेमाची अवस्था तर त्यापेक्षाही वाईट आहे. 5 दिवसांत या सिनेमाने फक्त 34.47 कोटींचा बिझनेस केला आहे.
#RakshaBandhan is a non-performer... Fails to hit double digits despite multiple holidays... 5-day total is a complete shocker... Thu 8.20 cr [#RakshaBandhan], Fri 6.40 cr, Sat 6.51 cr, Sun 7.05 cr, Mon 6.31 cr [#IndependenceDay]. Total: ₹ 34.47 cr. #India biz. pic.twitter.com/ZOFAJ7e58f
— taran adarsh (@taran_adarsh) August 16, 2022
येणाऱ्या सिनेमांवरही संकटाचे ढग?
आमिर व अक्षयचे सिनेमांची अशी गत झालेली पाहून आगामी सिनेमांच्या मेकर्सलाही धडकी भरली आहे. आमिर व अक्षय सारखे सुपरस्टार्स बॉक्स ऑफिसवरफ्लॉप ठरत असतील तर छोट्या सिनेमांचं काय? एकूणच बॉलिवूडचं काय? असा प्रश्न सर्वांना सतावू लागला आहे.