आमिर खानच्या लेकीचा लग्नाचा मुहूर्त ठरला, बॉयफ्रेंड नुपूरसोबत 'या दिवशी घेणार सातफेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 01:23 PM2023-12-20T13:23:44+5:302023-12-20T13:26:13+5:30
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरची लेक आयरा खान लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
सध्या मनोरंजन विश्वात लगीनघाई सुरू आहे. बॉलिवूड अभिनेत्री अभिनेत्री मालविका राजने गोव्यात प्रणव बग्गासोबत सात फेरे घेतले. यानंतर आता बॉलिवूडमधील आणखी एका कपलच्या विवाहाची चर्चा रंगली आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरची लेक आयरा खान लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आयरा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसह लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.
आयरा आणि नुपूर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. गेल्याच वर्षी त्यांचा साखरपुडा पार पडला होता. आता ते विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाची पात्रिका समोर आली आहे. व्हायरल होत असलेल्या पत्रिकेनुसार 13 जानेवारी २०२४ ला दोघे लग्न बंधनात अडकणार आहे. दोघेही मुंबईरात एका ग्रँड वेडिं करणार असून, त्याची तयारी सुरू झाली आहे. नुपूर आणि आयराच्या लग्नाला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी येणार आहेत. मात्र, या विवाह सोहळ्याच्या ठिकाणाची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
आयरा आणि नुपूर लॉकडाऊनदरम्यान आले जवळ
आयरा आणि नुपूर लॉकडाऊन दरम्यान एकमेकांच्या सर्वात जवळ आले होते. आयरा तिच्या मानसिक आरोग्याबद्दल अनेकदा बोलली आहे. ती देखील डिप्रेशनच्या टप्प्यातून गेली होती आणि त्यावेळी नुपूर शिखरेने तिला त्या वाईट टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत केली होती.आमिरने उघड केलेली आणखी एक गोष्ट म्हणजे त्याच्या मुलीच्या लग्नात निरोपाच्या वेळी तो खूप रडणार आहे. कारण तो दिवस खूप भावनिक असेल.