आमिर थिएटरमध्ये जाऊन पाहणार 'पिंजरा'

By Admin | Published: March 25, 2016 12:24 PM2016-03-25T12:24:21+5:302016-03-25T12:44:35+5:30

ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचा 'पिंजरा' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला असून अभिनेता आमिर खान तो थिएटरमध्ये जाऊन पाहणार आहे.

Aamir will go to the 'Pinjara' theater | आमिर थिएटरमध्ये जाऊन पाहणार 'पिंजरा'

आमिर थिएटरमध्ये जाऊन पाहणार 'पिंजरा'

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - श्रीराम लागू यांचा कसदार अभिनय व संध्या यांनी समरसून केलेली नर्तकीची भूमिका यांनी नटलेल्या व्ही. शांताराम दिग्दर्शित 'पिंजरा' या चित्रपटाने एकेकाळी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. आजही या सिनेमाची जादू कायम असून तब्बल ४४ वर्षांनंतर पिंजरा हा सिनेमा जुन्या आठवणींना उजाळा देत नव्या अंदाजात, डिजिटलाईज होऊन ७० एमएमच्या पडद्यावर अवतरला असून सर्व चित्रपटरसिक या चित्रपटाचा पुन्हा आस्वाद घेणार हे नक्कीच.. पण फक्त सामान्य प्रेक्षक नव्हे चित्रपटसृष्टीतील भल्याभल्यांवर अद्याप या चित्रपटाचे गारूड अद्यापही असून त्या यादीत आणखी एका अभिनेत्याचे नाव जोडले गेले आहे... तो अभिनेता म्हणजे मि.परफेक्शनिस्ट आमिर खान...!
ट्विटरवरून आमिरने या चित्रपटाचे खूप कौतुक केले असून आपण हा चित्रपट नक्कीच पाहणार असल्याचेही त्याने म्हटले आहे. ' दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचा शेवटचा चित्रपट असलेला "पिंजरा" पुन्हा प्रदर्शित झाला आहे, हे मला नुकतचं समजलं. आपल्या क्षेत्रातील महान दिग्दर्शकांच्या महान कलाकृती थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची संधी आपल्याला नेहमीच मिळते असं नाही! मी तरी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्कीच पाहणार आहे! तुम्हीही ही संधी चुकवू नका..' असे ट्विट आमिरने केले आहे. 
 
पिंजराला नवे रूप देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वितरक पुरुषोत्तम लढ्ढा प्रयत्न करीत होते. चंद्रसेना पाटील आणि पुरुषोत्तम लढ्ढा यांच्या पुष्पक प्रियदर्शनी फिल्म्सने व्ही. शांताराम प्रॉडक्शनकडून किरण शांताराम यांच्या सहकार्याने वितरणाचे हक्क घेतले. प्रसाद लॅबमध्ये या चित्रपटाच्या ओरिजिनल प्रिंटवर प्रक्रिया करीत तिचे २ के स्कॅनिंग करीत नवी अद्ययावत प्रिंट तयार केली. हँड क्लिनिंग, अल्ट्रासॉनिक क्लिनिंग, २ के स्कॅनिंग, ऑॅडिओ ग्रॅबिंग, कलर ग्रेडिंग, या नानविध तांत्रिक प्रक्रिया करून या अभिजात कलाकृतीला आधुनिकतेचा नवा साज चढवला आहे.
 

Web Title: Aamir will go to the 'Pinjara' theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.