Video: आण भवानीची, शान मराठीची; 'मनसे'च्या गाण्यावर थिरकली प्राजक्ता माळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 04:29 PM2023-04-03T16:29:52+5:302023-04-03T16:30:22+5:30

प्राजक्ता माळीनं मनसेच्या नव्या गाण्यावर मस्त डान्स बसवलाय. आण भवानीची, शान मराठीची... मनसे म्हणत प्राजक्ता या गाण्यावर थिरकलीय.

Aan of Bhawani, Shaan of Marathi; Actress Prajakta Mali will join 'MNS'? | Video: आण भवानीची, शान मराठीची; 'मनसे'च्या गाण्यावर थिरकली प्राजक्ता माळी

Video: आण भवानीची, शान मराठीची; 'मनसे'च्या गाण्यावर थिरकली प्राजक्ता माळी

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तर, मनसेसाठी ती कामही करते. काही दिवसांपूर्वीच तिने प्राजक्तराज नावाने एक ज्वेलरी ब्रँडही सुरू केला असून स्वत: राज ठाकरे पत्नीसह या ज्वेलरी ब्रँडच्या लाँचिंग सोहळ्याला उपस्थित होते. त्यामुळे, प्राजक्ता माळीचीमनसेसोबतची जवळीक लक्षात येईल. काही दिवसांपूर्वीच मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात मनसेचं नवं गाणं रिलीज करण्यात आलं. स्वत: अवधुत गुप्ते यांनी हे गाणं गायलं होतं. त्यानंतर, आता ह्याच गाण्यावर प्राजक्ता माळीनं भन्नाट डान्स केलाय. 

प्राजक्ता माळीनं मनसेच्या नव्या गाण्यावर मस्त डान्स बसवलाय. आण भवानीची, शान मराठीची... मनसे म्हणत प्राजक्ता या गाण्यावर थिरकलीय. राज ठाकरे फॅन क्लब नावाच्या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवरुन प्राजक्ताचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता ही मनसेच्या पक्षगीतावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला 'करू तयारी रे, घेऊ भरारी रे... राजमुद्रा ही मिरवूया' असं कॅप्शन देण्यात आलंय. मनसैनिकांना प्राजक्ताचा हा डान्स चांगलाच आवडलाय. त्यामुळे, अनेकांनी तिच्या गाण्यावर लय भारी कमेंट करुन कौतुक केलंय. 

दरम्यान, प्रश्न जिथं जनतेचा, मार्ग तिथं मनसेचा... या शब्द रचनेतून गाण्याची सुरुवात होते. 

Web Title: Aan of Bhawani, Shaan of Marathi; Actress Prajakta Mali will join 'MNS'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.