सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 04:25 PM2024-10-08T16:25:12+5:302024-10-08T16:26:10+5:30

सूरज सहानुभूतीमुळे जिंकल्याची अनेकांची प्रतिक्रिया येत आहे. एका अभिनेत्रीने तर 'छपरीपणा सुरु करायला हवा' असंच थेट म्हटलं आहे.

Aarti Solanki post viral after Suraj chavan won bigg boss marathi trophy | सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'

सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'

बारामतीचा सूरज चव्हाण (Suraj Chavan) 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. सूरज मनाने साधा, घरातील षडयंत्रापासून दूर असलेला असा सदस्य होता. तो घरात फारसा  अॅक्टिव्ह नव्हता. मात्र आपल्या झापूक झूपूक अंदाजाने त्याने सर्वांना वेड लावलं होतं. सूरज गरिबीतून वर आलेला असल्याने आणि अगदी निर्मळ मनाचा असल्याने महाराष्ट्रातील जनतेने त्यालाच पाठिंबा दिला. मात्र यामुळे काही कलाकारांना रागही आला आहे. सूरज सहानुभूतीमुळे जिंकल्याची अनेकांची प्रतिक्रिया येत आहे. एका अभिनेत्रीने तर 'छपरीपणा सुरु करायला हवा' असंच थेट म्हटलं आहे.

सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात त्याच्या साधेपणाने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.  पण त्याला बिग बॉस हा गेम म्हणून खेळता आला नाही यात शंकाच नाही. तरी त्याला विजेता केल्याने हे सहानुभूतीतूनच केल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. अभिनेत्री मिताली मयेकरने 'sympathy winner' अशी पोस्ट केली होती. तर आता अभिनेत्री आरती सोळंकीनेही (Aarti Solanki) मजेशीर पोस्ट केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर  'मी गरीब आहे' अशी पोस्ट टाकली. तसंच या सोबत कॅप्शनमध्ये लिहिले, 'छपरीपणा सुरु करायला हवा'. या पोस्टमागे तिने 'गोलमाल है भाई सब गोलमाल है' असं गाणं लावलं.


आरतीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत लिहिले, 'खरंच सिंपथी किंग, मनोरंजन न करणारा विजेता','शेवटी काय नशीब फक्त','टॅलेंटला किंमत नाही' अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. आरती सोळंकी सुद्धा बिग बॉस मराठीच्या पहिल्याच पर्वात सहभागी झाली होती. मात्र ती लवकर एलिमिनेटही झाली होती.

सूरजला कशाच्या जोरावर विजेता घोषित केलं असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी एक कलाकार व्यक्त होत म्हणाला की 'कित्येक वर्ष ऑडिशन दिल्या, रिजेक्शन पचवले, थिएटर केलं पण सिनेमात मुख्य भूमिका अजून मिळाली नाही. आणि कोणाला तरी नुसतं झापूक झुपूक करुन थेट लीड रोल मिळाला.' या पोस्टचं कारण म्हणजे केदार शिंदे सूरजला घेऊन 'झापूक झुपूक' हा सिनेमा करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. यामुळे सिनेसृष्टीत नाराजीची लाट उसळली आहे.

Web Title: Aarti Solanki post viral after Suraj chavan won bigg boss marathi trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.