बॉलिवूडचा आणखी एक बॅचलर बोहल्यावर चढणार, अभय देओल 46 व्या वर्षी बांधणार लग्नगाठ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 12:15 PM2022-05-20T12:15:59+5:302022-05-20T12:18:20+5:30

Abhay Deol : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. गेल्या महिन्यात आलिया भट व रणबीर कपूर लग्नबंधनात अडकले. त्याआधी कतरिना कैफ व विकी कौशल याचं लग्न झालं. आता बॉलिवूडचा आणखी एक बॅचलर लग्नबंधनात अडकणार आहे.

Abhay Deol hints at his wedding, says 'I am getting married | बॉलिवूडचा आणखी एक बॅचलर बोहल्यावर चढणार, अभय देओल 46 व्या वर्षी बांधणार लग्नगाठ!!

बॉलिवूडचा आणखी एक बॅचलर बोहल्यावर चढणार, अभय देओल 46 व्या वर्षी बांधणार लग्नगाठ!!

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. गेल्या महिन्यात आलिया भट व रणबीर कपूर लग्नबंधनात अडकले. त्याआधी कतरिना कैफ व विकी कौशल याचं लग्न झालं. आता बॉलिवूडचा आणखी एक बॅचलर लग्नबंधनात अडकणार आहे. होय, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्र यांचा पुतण्या व अभिनेता अभय देओल (Abhay Deol) लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

अभय देओलचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात त्याने लग्नाची घोषणा केली आहे. मी लवकरच लग्न करणार आहे, असं तो म्हणतोय.
‘जंगल क्राई’ या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये अभय लग्नाबद्दल बोलला. होय, मी लग्न करतोय, असं  तो म्हणाला. कुणाशी, कधी, याचा खुलासा करणं मात्र त्याने टाळलं. अभयच्या आयुष्यातील मिस्ट्री गर्ल कोण, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 46 वर्षांचा अभय देओल दीर्घकाळ अभिनेत्री प्रीती देसाईला डेट करत होता. जवळजवळ 4 वर्षे दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र 2014 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं होतं.
अभय हा  ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्र यांचा भाऊ अजीत सिंह देओल यांचा मुलगा आहे. 

अभय शिलो शिव सुलेमान करतोय डेट?
सप्टेंबर 2021 मध्ये अभयने शिलो शिव सुलेमानसोबतचे काही फोटो शेअर केले होते. हे रोमॅन्टिक फोटो पाहून अभयच्या लाईफमध्ये शिलो शिव सुलेमान हिची एन्ट्री झाल्याचं मानलं गेलं होतं. अर्थात अभयने या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता.  शिलो हिचा अ‍ॅक्टिंगच्या दुनियेशी काहीही संबंध नाही. ती एक कन्टेम्पररी आर्टिस्ट आहे. 32 वर्षाच्या शिलो शिव सुलेमानला तिच्या इलस्ट्रेशन व इन्स्टॉलेशन आर्टसाठी ओळखले जाते. कर्नाटकच्या बेंगळुरू येथे जन्मलेली शिलो अतिशय बिनधास्त आयुष्य जगते.  शिलोला भटकंतीची प्रचंड आवड आहे. बिनधास्त जगणारी, बिनधास्त वागणारी, सोशल मुद्यांवर परखड मत मांडणा-या शिलोचे अभयशी काय नाते आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण चर्चा जोरात होती.

Web Title: Abhay Deol hints at his wedding, says 'I am getting married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.