अभिज्ञा भावे झळकणार हिंदी मालिकेत, पोस्ट शेअर करत म्हणाली - 'थोडीसी मेहनत और...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 12:32 PM2023-07-10T12:32:07+5:302023-07-10T12:32:43+5:30

अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) शेवटची 'तू तेव्हा तशी' (Tu Tevha Tashi) मालिकेत काम करताना दिसली होती.

Abhidnya Bhave will appear in the Hindi serial, shared the post and said - 'Thodisi mukhata aur...' | अभिज्ञा भावे झळकणार हिंदी मालिकेत, पोस्ट शेअर करत म्हणाली - 'थोडीसी मेहनत और...'

अभिज्ञा भावे झळकणार हिंदी मालिकेत, पोस्ट शेअर करत म्हणाली - 'थोडीसी मेहनत और...'

googlenewsNext

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) शेवटची झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' (Tu Tevha Tashi) मालिकेत काम करताना दिसली होती. या मालिकेत तिने पुष्पवल्लीची निगेटिव्ह भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अभिज्ञा सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिला मालिकेत जितकी पसंती मिळते तितकेच तिचे रील्स आणि व्हिडिओस सुद्धा चाहत्यांना आवडतात. दरम्यान आता तिने तिच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. लवकरत ती नव्या मालिकेत काम करताना दिसणार आहे.

अभिज्ञा भावे शेवटची छोट्या पडद्यावर तू तेव्हा तशी मालिकेत श्रीवल्लीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. या मालिकेतील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. दरम्यान आता ती एका नव्या मालिकेत मिळणार आहे. ही माहिती तिने खुद्द इंस्टाग्रामवर सांगितली आहे. तिने मालिकेतला तिचा लूक आणि सेटवरील काही फोटो शेअर करत याबद्दल सांगितले आहे.

अभिज्ञा भावे लवकरच हिंदी मालिकेत दिसणार आहे. देर आये दुरुस्त आये असं या मालिकेचं नाव असून ही मालिका स्टार प्लसवर प्रसारीत होणार आहे. मालिकेतील लूक आणि सेटवरील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत अभिज्ञाने लिहिले की, कुछ ज्यादा नहीं बस १२ साल की थोडीसी मेहनत और जिद. बातें कुछ अनकही सी... लवकरच स्टार प्लस. तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. चाहते तिला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Web Title: Abhidnya Bhave will appear in the Hindi serial, shared the post and said - 'Thodisi mukhata aur...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.