गायक अभिजीत भट्टाचार्यच्या मुलालाही कोरोनाची लागण, विदेशात जाण्यापूर्वी टेस्ट केली अन् पॉझिटीव्ह आली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 01:32 PM2020-07-24T13:32:33+5:302020-07-24T13:33:08+5:30

स्वत: अभिजीतने केला खुलासा

abhijeet bhattacharyas son tests positive for covid 19 | गायक अभिजीत भट्टाचार्यच्या मुलालाही कोरोनाची लागण, विदेशात जाण्यापूर्वी टेस्ट केली अन् पॉझिटीव्ह आली

गायक अभिजीत भट्टाचार्यच्या मुलालाही कोरोनाची लागण, विदेशात जाण्यापूर्वी टेस्ट केली अन् पॉझिटीव्ह आली

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या काही आठवड्यांत बॉलिवूडमधील अनेकांना कोरोना झाला आहे.

कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले असताना बॉलिवूडमध्येही या व्हायरसने अनेकांना विळखा घातला आहे. बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली. आता बॉलिवूड सिंगर अभिजीत भट्टाचार्यचा मुलगा ध्रुव यांलाही कोरोनाचे निदाण झाले आहे. स्वत: अभिजीतने याचा खुलासा केला.

माझा मुलगा ध्रुव एका इंटरनॅशनल ट्रिपवर जाणार होता. या ट्रिपची तयारी तो करत होता. त्यापूर्वी गाइडलाईन्सनुसार त्याची कोरोना टेस्ट केली गेली. त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. यानंतर त्याने स्वत:ला घरीच आयसोलेट केले आहे. ध्रुवमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आलीत. त्यामुळे त्याला रूग्णालयात भरती करण्याची वेळ आली नाही. केवळ त्याला थोडासा खोकला आणि सर्दीचा त्रास आहे. सध्या तो घरी राहून स्वत:ची काळजी घेतोय, असे अभिजीतने सांगितले.

अभिजीत सध्या घरी नही. तो एका शूटींगसाठी कोलकात्यात आहे. मुलाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यानेही कोरोना टेस्ट केली. ती निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे अभिजीत यांनी शूटींग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. अभिजीतचा मुलगा ध्रुव रेस्टॉरंट चालवतो. याचसंदर्भात तो विदेशात जाण्याच्या तयारीत होता.
गेल्या काही आठवड्यांत बॉलिवूडमधील अनेकांना कोरोना झाला आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या बच्चन यांना कोरोनाची लागण झाली. अनुपम खेर यांची आई, भाऊ, वहिनी व पुतणीचीही कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. त्याआधी आमिर खान, बोनी कपूर यांच्या स्टाफ मेंबर्सलाही कोरोना झाल्याचे निदान झालेय.

Web Title: abhijeet bhattacharyas son tests positive for covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.