‘अशी ही आशिकी’चा Trailer Out, या तारखेला सिनेमा रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 02:35 PM2019-02-16T14:35:52+5:302019-02-16T14:38:18+5:30
आशिकी करताना मैत्री, प्रेम, रोमान्स, एक्सप्रेशन्स, भावना, कन्फ्युजन या गोष्टी प्रत्येक जण अनुभवतात. प्रेमाची नवीन डेफिनेशन देणारी कथा म्हणजे सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ हा मराठी सिनेमा.
एखाद्या व्यक्तीवर आपण मनापासून आणि अगदी वेड्यासारखं प्रेम करतो तेव्हा त्याला आशिकी असे म्हणतात. आशिकी करताना मैत्री, प्रेम, रोमान्स, एक्सप्रेशन्स, भावना, कन्फ्युजन या गोष्टी प्रत्येक जण अनुभवतात. प्रेमाची नवीन डेफिनेशन देणारी कथा म्हणजे सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ हा मराठी सिनेमा. गुलशन कुमार प्रस्तुत ‘अशी ही आशिकी’ सिनेमाची निर्मिती टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार यांनी केली आहे. तसेच मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनी देखील या सिनेमाची निर्मिती केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे ही या सिनेमाचे निर्माते आहेत.
पूर्वी प्रेम कनफेस करण्यासाठी फूल आणि प्रेमाचे दोन शब्द पुरेसे होते. पण आताची जनरेशन ही एक स्टेप पुढे असल्यामुळे आता कनफेशनचं कनफ्युझन आणि इमोशनचं कमोशन झालंय. प्रेम जरी कॉम्पलिकेट बनलं असलं तरी स्वयम आणि अमरजाची आशिकी ही जरा वेगळीच आहे, याचा अंदाज प्रेक्षकांना ‘अशी ही आशिकी’च्या टीझरमधून आला होता.
आता प्रेक्षकांना या सिनेमाच्या कथेची आणखी एक झलक दाखवण्यासाठी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ सारख्या रोमँटिक दिवशी ‘अशी ही आशिकी’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे या नवीन जोडीची रोमँटिक कथा, कथेचा एकंदरीत अंदाज, सुनिल बर्वे, निर्मिती सावंत, फ्रेण्ड्सच्या भूमिकेत असलेले करण भानुशाली, स्नेहल बोरकर, स्वामिनी वाडकर आणि सिध्देश नागवेकर या कलाकारांची एक झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
‘प्रेम कधीच इतकं तितकं नसतं... ते एक तर असतं किंवा नसतं’, ‘जे मोजून मापून केलं जात नाही त्यालाच प्रेम म्हणतात’ यांसारखे प्रेमळ डायलॉग्स, स्वयम आणि अमरजाच्या नात्यातील सुंदर आणि फ्रेण्डली क्षण, बँकग्राऊंड म्युझिक, गाणी, लोकेशन्स इत्यादी गोष्टी प्रेक्षकांची या सिनेमाप्रती असलेली उत्सुकता अजून वाढवणार यात शंकाच नाही. ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ म्हणत प्रत्येकाला ‘अशी ही आशिकी’ करायला भाग पाडण्यासाठी हा सिनेमा १ मार्च २०१९ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.