'या' खऱ्या घटनेवर आधारीत अभिषेक बच्चनचा I want to talk सिनेमा, वाचून तुम्हीही व्हाल भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 10:26 AM2024-11-24T10:26:08+5:302024-11-24T10:26:56+5:30
अभिषेक बच्चनचा I want to talk सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमामागची खरी घटना काय?
शूजित सरकार दिग्दर्शित अभिषेक बच्चनचा I want to talk सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाची भावुक कहाणी सध्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आणतेय. I want to talk मध्ये अभिषेक बच्चनने त्याच्या कारकीर्दीतील बेस्ट परफॉर्मन्स दिलाय असं लोकांंचं म्हणणं आहे. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारीत आहे. सिनेमाचे दिग्दर्शक शूजित सरकार यांच्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या घटनेवर सिनेमा आधारीत आहे. काय आहे ती घटना?
खऱ्या घटनेवर आधारीत सिनेमा
अभिषेक बच्चनचा हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारीत आहे. NRI असलेल्या अर्जुन सेनवर हा सिनेमा आधारीत आहे. अर्जुनला कॅन्सरसारखा भयंकर आजार झालेला असतो. खऱ्या आयुष्यातील अर्जुन हा सिनेमाचे दिग्दर्शक शूजित सरकार यांचा मित्र आहे. अर्जुनला लाईफ ऑल्टरींग सर्जरीचा सामना करावा लागतो. याशिवाय त्याची बायको त्याला घटस्फोट देते. त्यामुळे तो मुलगी रियाला आठवड्यातून तीन दिवस सांभाळतो.
A film that leaves you wanting for more!#IWantToTalk running successfully in theatres near you.
— PVR INOX Pictures (@PicturesPVR) November 23, 2024
.
.
.#ShoojitSircar#AbhishekBachchan#WTT#ShoojitSircarsNext#RisingSunFilms#RSF#KinoWorks#Blabberheadpic.twitter.com/GSDEpeXLY3
‘लाइरेंजियल कैंसर’सारख्या गंभीर आजारावर भाष्य
अभिषेक बच्चनचा हा सिनेमा ‘लाइरेंजियल कैंसर’ (laryngeal cancer) या गंभीर आजारावर भाष्य करतो. या कॅन्सरमुळे अर्जुनला २० सर्जरी कराव्या लागतात. त्यानंतर हळूहळू हा कॅन्सर अर्जुनच्या पूर्ण शरीरात पसरतो अन् त्यामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो. कॅन्सरवरील उपाचारासाठी अर्जुनला वारंवार हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. याच अर्जुनवर आधारीत I want to talk सिनेमा आहे. सध्या या सिनेमातील विषयाचं आणि अभिषेक बच्चनच्या अभिनयाचं चांगलं कौतुक होतंय