"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 02:22 PM2024-11-25T14:22:25+5:302024-11-25T14:22:46+5:30
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेकने ऐश्वर्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. घरी राहून लेक आराध्याची काळजी घेण्याबाबत अभिषेकने कॅमेऱ्यासमोर ऐश्वर्याला थँक्यू म्हटलं आहे.
अभिषेक बच्चन सध्या त्याच्या 'आय वॉन्ट टू टॉक' या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याच्या या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अभिषेक अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेकने ऐश्वर्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. घरी राहून लेक आराध्याची काळजी घेण्याबाबत अभिषेकने कॅमेऱ्यासमोर ऐश्वर्याचं कौतुक केलं आहे.
अभिषेकने नुकतीच द हिंदूला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिषेकने मुलांसाठी आईला करिअर सोडावं लागतं. तर वडील कुटुंबासाठी काम करतात, असं भाष्य केलं. तो म्हणाला, "मी खूप भाग्यवान आहे की मला घराबाहेर पडून सिनेमासाठी काम करण्याची संधी मिळते. कारण, मला माहीत असतं की घरात ऐश्वर्या माझी लेक आराध्याची काळजी घेत आहे. आणि यासाठी मी तिला धन्यवाद म्हणेन. पण, मुलं तुम्हाला याप्रकारे बघत नाहीत".
"जेव्हा माझा जन्म झाला होता तेव्हा माझ्या आईने अभिनयातून ब्रेक घेतला होता. कारण, तिला मुलांबरोबर वेळ घालवायचा होता. पण, वडील नसताना आम्हाला कधीच त्यांची कमी जाणवली नाही. एक आईवडील असल्याच्या नात्याने तुमची मुलं तुम्हाला प्रेरणा देतात. मला याबाबतीत आई आणि महिलांचा खूप आदर वाटतो. कारण, त्या ज्या काही करतात, ते कोणीच करू शकत नाही. पण, वडील हे सगळं शांतपणे करतात. कारण, त्यांना माहीत असतं हे कसं करायचं आहे. हाच पुरुषांमधला एक दोष आहे. पण, वयानुसार वडील किती दृढ आहेत, याची जाणीव त्याच्या मुलांना होते", असंही अभिषेक म्हणाला.
अभिषेकने या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्याबाबतही भाष्य केलं. तो म्हणाला, "मी मोठा होत असताना वडिलांचा फार सहवास लाभला नाही. ते माझ्या बाजूच्या खोलीत झोपायचे. ते नेहमी आम्ही झोपल्यानंतर घरी यायचे आणि सकाळी उठायच्या अगोदरच निघून गेलेले असायचे. एवढे व्यस्त असतानादेखील ते माझ्या शाळेतील कार्यक्रम आणि बास्केटबॉल फायनलला नेहमी हजर असायचे".