'लागिरं झालं जी' या मालिकेतील अभिनेत्याचं अपघाती निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 06:32 PM2022-01-17T18:32:26+5:302022-01-17T18:32:48+5:30

'लागिर झालं जी' (Lagir Jhala Ji) फेम अभिनेत्याच्या गाडीचा रोटी घाटातून प्रवास करत असताना अपघात झाला. त्यानंतर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र १४ जानेवारीला त्यांची प्राणज्योत मालवली.

Accidental death of 'Lagir Jhala Ji' fame Actor Dr. Dnyanesh Mane | 'लागिरं झालं जी' या मालिकेतील अभिनेत्याचं अपघाती निधन

'लागिरं झालं जी' या मालिकेतील अभिनेत्याचं अपघाती निधन

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवरील लागिरं झालं जी (Lagir Jhala Ji) या मालिकेतील अभिनेते डॉ. ज्ञानेश माने (Dr.Dnyanesh Mane) यांचे १४ जानेवारी रोजी अपघाती निधन झाले आहे. डॉ ज्ञानेश माने हे रोटी घाटातून प्रवास करत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अपघातानंतर ते बेशुद्धावस्थेत होते. त्यानंतर त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र १४ जानेवारी रोजी सकाळीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे बारामतीतील उत्कृष्ट आणि हरहुन्नरी कलाकार हरपल्याची खंत व्यक्त केली जात आहे. 

अभिनेतै डॉ. ज्ञानेश माने हे पेशाने डॉक्टर होते. मुळचे ते बारामतीतील झारगडवाडी या गावचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, भावजया आणि पुतणे असा परिवार आहे. लागिरं झालं जी या मालिकेत अभिनेते डॉ ज्ञानेश माने एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते.

डॉक्टरकीची सेवा देखील केली होती

याशिवाय निरपराध, भक्तांचा पाठीराखा , सोलापूर गॅंगवार, काळूबाईच्या नावानं चांगभलं, आंबूज, हंबरडा, यदया, पळशीची पी टी अशा अनेक चित्रपट आणि मालिकेमधून त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या होत्या. दरम्यान अभिनयासोबत त्यांनी डॉक्टरकीची सेवा देखील केली होती. ही तारेवरची कसरत करत असताना कलासृष्टीत त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. 

Web Title: Accidental death of 'Lagir Jhala Ji' fame Actor Dr. Dnyanesh Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.