जगातील साऱ्या संधी आत्मसात करायच्यात
By Admin | Published: April 25, 2016 03:22 AM2016-04-25T03:22:56+5:302016-04-25T03:22:56+5:30
हे तिच्यासाठी पदार्पण असले, तरी खऱ्या अर्थाने नव्हे. गेली दीड दशके मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम केल्यानंतर वलुशा डिसूझा हे नाव कॅमेऱ्यासाठी नवे नाही.
हे तिच्यासाठी पदार्पण असले, तरी खऱ्या अर्थाने नव्हे. गेली दीड दशके मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम केल्यानंतर वलुशा डिसूझा हे नाव कॅमेऱ्यासाठी नवे नाही. किंग खानसोबत आणि वैशाली सामंतच्या (विंचू चावला) गाण्यात अशा अनेक ठिकाणी ती चमकली आहे. लग्न आणि मुलांच्या जन्मानंतर अनेक अभिनेत्री निवृत्ती घेतात. तीन मुलांच्या जन्मानंतर वलुशाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.घटस्फोटासारखी दुर्दैवी गोष्ट मागे ठेवून ती आता पुढे जाते आहे. तिच्या बोलण्यातून आत्मविश्वास झळकतो. ‘सीएनएक्स डिजिटलसोबत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
वलुशा - समीक्षक म्हणतात, मॉडेल्स चांगल्या अभिनेत्री होऊ शकत नाही किंवा देशी भूमिका त्या करू शकत नाहीत. तुला काय वाटते?
वलुशा - मला विश्वास आहे, दीपिका, ऐश्वर्या आणि प्रियांका चोप्रा यांनी हा नियम मोडला आहे. मला खात्री आहे, मॉडेल्स थोड्याशा ताठर स्वभावाच्या असतात. मी ‘फॅन’मध्ये नव्या युगाची महिला आहे. मात्र, प्रत्यक्षात मी देशीही तितकीच आहे. मी नऊवारी साडीमध्ये मराठी व्हिडीओ ‘ंिवंचू’मध्ये काम केले आहे.
> - तू अशा वेळी चित्रपटसृष्टीत आलीस, ज्या वेळी महिला बाहेर पडतात. तुझ्या मॉडेलिंगच्या दिवसांपासून तुला ऐकत आहोत, तुला इथे येण्यास इतका वेळ का लागला?
वलुशा - खरं सांगायचे म्हणजे, हा उशीर नव्हे! मी १९ व्या वर्षी लग्न केले आणि वयाच्या २५ व्या वर्षी मला तीन मुले आहेत. तसं पाहिलं तर मी फार जुनी नाहिए. यापूर्वी माझ्या आयुष्यात जे झालं ते वाहत गेल्यामुळे झालं. लग्नानंतर माझ्या अपेक्षेप्रमाणे काही झाले नाही आणि आयुष्याने वेगळे वळण घेतले. ही माझ्यासाठी नवीन सुरुवात आहे. माझ्या आयुष्यातील घटनांना मी मागे टाकले आहे आणि माझ्यातील ऊर्जा नव्याने घेण्याचा माझा प्रयत्न आहे. सध्या जगात खूप संधी आहेत आणि त्या आत्मसात करण्याचा माझा प्रयत्न आहे. माझ्या पूर्वायुष्याची छाया पडू नये, यासाठी मी प्रयत्न करते आहे.- ‘फॅन’ हा पदार्पणासाठी मोठा चित्रपट आहे. शाहरुखसोबत काम करताना तुला कसं वाटलं?
वलुशा - ‘फॅन’च्या बाबतीत सांगायचे झाल्यास, या प्रोजेक्टने मला निवडले. ज्या वेळी मी अभिनयाच्या बाबतीत शोधायला सुरुवात केली, मला कास्टिंग डिरेक्टर शानू शर्माला भेटावयास सांगण्यात आले होते. तिने मला आॅडिशन देण्यास सांगितली. त्यासाठी मी तयार झाले आणि दिलीही. अगदी दोन दिवसांत तिने मला परत बोलाविले आणि दिग्दर्शक मनीष शर्माला भेटण्यास सांगितले. त्याच्यासोबतही खूप छान चर्चा झाली. तथापि, मला तोपर्यंत खात्री नव्हती की, ते मला ‘फॅन’साठी ग्राह्य धरत आहेत. मनीषने जेव्हा शाहरुखसोबत तू काम करतीयेस, असं सांगितले, त्या वेळी मी शहारून गेले होते.- शूटिंगचा पहिला दिवस कसा होता?
वलुशा - अगदी भीषण! माझ्या घरातील पायऱ्यावर धावण्याचा हा प्रसंग होता. मी अगदी घट्ट नाइट ड्रेस परिधान केला होता आणि शाहरुखच्या बाहूत जाण्यासाठी मी धावत होते. मी खूप घाबरलेली होते. सेटवर शेकडो लोक होते. आम्हाला सेलफोन वापरण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मी माझ्या मित्रांशी याबाबत बोलू शकले नाही. त्या वेळी कोणताही संवाद नव्हता. मी थेट शाहरुखच्या बाहूत उडी मारली. मला त्या वेळी संयम राखायचा होता, परंतु मला तो शॉट करताना अगदी मेल्याहून बिकट झाले होते. चांगली गोष्ट म्हणजे, शाहरुख खानने हा प्रसंग संयमाने हाताळला. २ ते ३ टेकमध्ये मी आरामदायकरीत्या हा शॉट दिला. जेव्हा मला खात्री पटली, त्या वेळी माझे काम सुरळीतपणे सुरू झाले.- पण तू पहिल्यांदाच शाहरुखसोबत काम करीत नव्हतीस? त्याच्यासोबत तू दोन चित्रपट केले आहेस?
वलुशा - हो, मी ज्या वेळी १६ वर्षांची होते, त्या वेळी मी शाहरुखला भेटले होते. त्या वेळी मी ‘मिस इंडिया’ स्पर्धेत सहभागी झाले होते आणि तो परीक्षक होता. आमची दुसऱ्यांदा भेट अनेक वर्षांनंतर झाली, जेव्हा मी मॉडेल बनले आणि पेप्सीच्या जाहिरातीत त्याच्यासोबत काम केले. प्रल्हाद कक्कड यांनी ती जाहिरात तयार केली होती. काही वर्षांनंतर ह्युंदाईच्या जाहिरातीमध्ये आम्ही सोबत काम केले होते.- तुझ्या अभिनयाबाबत मुलांच्या काय प्रतिक्रिया आहेत?
वलुशा - ती अगदी भारावून गेली आहेत. त्यांच्याकडे आवडीच्या कलाकारांची यादीच आहे, ज्यांच्यासोबत ते काम करू इच्छितात. त्यांनी ‘फॅन’ हा चित्रपट आपल्या मित्रांसोबत विविध सेट्सवर पाहिलाय. त्यांची उत्सुकता आणि उत्साह यामुळे मला प्रेरणा मिळाली. मी हे करते आहे, हे पाहून मुलंही आनंदी आहेत. त्यांचा अभिमान हाच माझ्यासाठी पुरस्कार आहे.