दमदार अभिनय; मात्र दुबळे कथानक

By Admin | Published: October 10, 2015 04:22 AM2015-10-10T04:22:19+5:302015-10-10T04:22:19+5:30

‘जज्बा’ चित्रपटातून ऐश्वर्या रायने रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले असून दिग्दर्शक संजय गुप्ताने ‘महिलांवरील बलात्कार’ या देशव्यापी गंभीर मुद्द्याकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी

Acting intensely; But the weak story | दमदार अभिनय; मात्र दुबळे कथानक

दमदार अभिनय; मात्र दुबळे कथानक

googlenewsNext

- अनुज अलंकार (हिंदी चित्रपट)

‘जज्बा’ चित्रपटातून ऐश्वर्या रायने रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले असून दिग्दर्शक संजय गुप्ताने ‘महिलांवरील बलात्कार’ या देशव्यापी गंभीर मुद्द्याकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी कथानकाला रहस्यमय आणि रोमांचक स्वरूप दिले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना प्रसारमाध्यमात दररोज झळकत असतात. तथापि, बलात्कार करणाऱ्यांना कठोर सजा का होत नाही, कायद्यात त्रुटी आहेत का? त्यात काही बदल करणे आवश्यक आहे, या अनुषंगाने विविध स्तरांवर व्यापक चर्चा झडत असते. या गंभीर विषयावर बेतलेल्या या चित्रपटाचे कथानक दुबळे झाले असले तरी ऐश्वर्या राय आणि इरफान खान यांच्या दमदार अभिनयाची जुगलबंदी प्रशंसनीय आहे.
मुंबईतील वकील अनुराधा वर्मा (ऐश्वर्या राय) यांची कन्या सनायाचे (सारा अर्जुन) अपहरण करणाऱ्याचा असा आग्रह असतो की, बलात्कार आणि हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला आरोपी नयाज (चंदर सान्याल) याचा बचाव करण्यासाठी अनुराधाने हायकोर्टात खटला लढवावा. मुलगी सहीसलामत राहावी म्हणून अनुराधा राजी होते आणि नयाजला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करणे सुरू करते. प्रो. गरिमा चौधरी (शबाना आझमी) यांची मुलगी सियावर (पिया बॅनर्जी) बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या गुन्ह्यात नयाजला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली असते.
लाचखोरीचा आरोप असलेल्या पोलीस इन्स्पेक्टर योहानशी (इरफान खान) अनुराधाची मैत्री असते. तिच्यावर त्याचे एकतर्फी प्रेमही असते. तथापि, तो आपल्या भावना व्यक्त करीत नाही. आपल्या मुलीचे अपहरण झाल्याचेही ती योहानला सांगत नाही. प्रत्येक अडचणीत तो अनुराधाला साथ देतो. नंतर मात्र ती योहानला सर्व काही सांगून टाकते. तिच्या संघर्षात योहानही सहभागी होतो. अनुराधाच्या मुलीच्या अपहरणामागचे सत्य उजेडात येताच गरिमा यांच्या मुलीच्या हत्या प्रकरणाचाही पर्दाफाश होतो.
उणिवा : इंग्रजी चित्रपटाची नक्कल करण्याच्या नादात संजय गुप्ता यांनी पटकथेवर फारसे लक्ष दिले नाही. प्रतिभावंत कलाकारांची फौज असतानाही संजय गुप्ताला त्याचा फायदा घेता आला नाही. मुलीचे अपहरण झाल्याची बाब अनुराधा योहानपासून का लपवून ठेवते? लाचखोरीचे आरोप असताना या प्रकरणात पोलीस खाते योहानला सहकार्य करण्यास तत्पर असते. गरिमाच्या मुलीच्या हत्या प्रकरणाचा संबंध अनुराधाच्या मुुलीच्या अपहरणाशी जोडण्यासाठी आटापिटा का करण्यात आला, हे उमजत नाही. शबाना आझमीची नेमकी भूमिका कोणती, हे स्पष्ट होत नाही. जॅकी श्रॉफला तर ज्युनियर कलाकारच केले आहे. पिया बॅनर्जीला ग्लॅमरपुरताच वाव देण्यात आला आहे. दुबळे गीत-संगीत आणि सुमार दिग्दर्शनामुळे कथानक कमकुवत झाले आहे.

वैशिष्ट्ये :
इरफान खानचा दमदार अभिनय हा या चित्रपटाचा सर्वात चांगला पैलू होय. या चित्रपटात त्याच्या भूमिकेला स्टारडम मिळाले. इरफानच्या संवाद सादर करण्याच्या खास शैलीसाठी प्रेक्षकांच्या टाळ्या पडतात. व्यावसायिक चित्रपटातील आजवरच्या अभिनयाच्या तुलनेत या चित्रपटातील त्याची भूमिका सर्वात सरस ठरली आहे. अतुल कुलकर्णी, चंदन सान्याल प्रेक्षकांच्या नजरेत भरत नाहीत. तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट
चांगला झाला आहे. अ‍ॅक्शन दृश्येही जबरदस्त असून ऐश्वर्यानेही यासाठी खूप मेहनत घेतल्याचे जाणवते.

का पाहावा :
इरफानचा दमदार अभिनय
आणि ऐश्वर्याचे पुनरामगन.

का पाहू नये :
कमकुवत कथानक आणि पटकथा.

Web Title: Acting intensely; But the weak story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.