फक्त १० रुपये खर्च अन् बसने प्रवास! 'या' बॉलिवूड सुपरस्टारने स्वस्तात मस्त केलेलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 12:01 PM2024-07-12T12:01:54+5:302024-07-12T12:05:53+5:30
बॉलिवूडमधला असाही एक सुपरस्टार ज्याने कमी पैशात लग्न करुन सर्वांनाच आश्चर्यचकीत करुन सोडलं
सध्या बॉलिवूड कलाकारांच्या लग्नाला अमाप खर्च झालेला पाहायला मिळतो. कोट्यावधी रुपये खर्च करत हे कलाकार रिसेप्शन आणि इतर गोष्टींवर खर्च करत थाटामाटात लग्न करतात. काही कलाकार तर परदेशी लग्नाचा थाट घालतात. अशातच एका कलाकाराच्या लग्नाबद्दल एक इंटरेस्टिंग माहिती समोर येतेय. ती म्हणजे या कलाकाराने फक्त १० रुपयांत लग्न करुन लग्नासाठी बसने प्रवास केला होता. हा सुपरस्टार दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे आमिर खान.(aamir khan)
आमिर खानच्या लग्नाला खर्च फक्त १० रुपये
आमिर खानने एका मुलाखती त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल खुलासा केला. आमिरने रीना दत्तासोबत लग्न केलं होतं. १९८६ साली आमिर-रीनाने सर्वांपासून लपवून ठेवत रजिस्टर मॅरेज केलं होतं. आमिरने सांगितलेलं की, बसचा प्रवास करत तो रजिस्ट्रार ऑफिसमध्ये गेला होता. त्याने २११ नंबरची बस पकडली होती. बसचं तिकीट होतं फक्त ५० पैसे. आमिर-रीनाच्या लग्नाला तीन साक्षीदार होते. कोणताही गाजावाजा न करता फक्त १० रुपयांत आमिर-रीनाने लग्न केलं होतं.
#WATCH : Aamir Khan, Reena Dutta And Kiran Rao attends daughter Ira Khan & Nupur Shikhare wedding reception at Taj Lands End, Bandra in Mumbai.#IraKhanWedding#IraKhan#NupurShikhare#AamirKhan#ReenaDutta#KiranRaopic.twitter.com/S3qAjwh2Kk
— upuknews (@upuknews1) January 3, 2024
लग्नानंतर १६ वर्षांनी झाला घटस्फोट
आमिरने जेव्हा लग्न केलं तेव्हा तो अवघ्या २१ वर्षांचा होता. तर रीना त्याच्यापासून दोन वर्ष लहान १९ वर्षांची होती. पुढे लग्नाच्या १६ वर्षांनंतर २००२ साली या दोघांनी घटस्फोट घेतला. या दोघांना जुनैद आणि आयरा ही दोन मुलं आहेत. आयराने काही महिन्यांपूर्वी नुपुर शिखरेसोबत लग्न केलं. तर जुनैदने 'महाराज' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.