गौतमी पाटीलच्या डान्सवर नृत्यांगना माधुरीने घेतला आक्षेप; म्हणाली, “आपण काय करतोय ते...”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 01:08 PM2023-06-15T13:08:14+5:302023-06-15T13:10:56+5:30

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या डान्सवर आतापर्यंत अनेकांनी आक्षेप घेतले आहेत.

actor and dancer madhuri pawar reaction over gautami patil dance | गौतमी पाटीलच्या डान्सवर नृत्यांगना माधुरीने घेतला आक्षेप; म्हणाली, “आपण काय करतोय ते...”

गौतमी पाटीलच्या डान्सवर नृत्यांगना माधुरीने घेतला आक्षेप; म्हणाली, “आपण काय करतोय ते...”

googlenewsNext

Gautami Patil: सबसे कातील... गौतमी पाटील... हे वाक्य आज अनेकांच्या ओठी ऐकायला मिळते. दिवसेंदिवस तिची क्रेझ वाढत चालेली दिसत आहे. राज्यातील एकही असा जिल्हा नसेल जिथे गौतमीचा कार्यक्रम होत नसेल. गौतमी पाटील आपल्या तालुक्यात येणार हे कळताच हजारो चाहते कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होतात. गौतमीच्या कार्यक्रमात बसायला जागा नसते, त्यामुळे अनेकदा राडाही होतो. गौतमी पाटीलच्या डान्सवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. या यादीत आता आणखी एका नृत्यांगनाची भर पडली आहे. प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्रीने गौतमी पाटीलच्या डान्सवर आक्षेप घेत टीका केली आहे. 

गौतमी सादर करीत असलेला नृत्य प्रकार कोणता आहे हे मला तर माहिती नाही. सादर करणाऱ्याला कळायला हवे आपण कोणता प्रकार करतोय. मी तिचा कार्यक्रम पाहिलेला नाही. पाहिल्यावरच समजेल कोणता नृत्य प्रकार करते. सध्या तरी आवर्जून पाहायला जायला मला वेळ नाही. एखाद्याकडेच जर आक्षेप घेऊन बोट दाखवले जात असेल तर आपण कुठे चुकतोय का? हे आप आपल्याल कळणे महत्त्वाचे आहे. चुकीचे होत असेल तर बदलावे. योग्य असेल तर तसेच सुरु ठेवावे. लोककला छान आहे.जिवंत रहायला हवी, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार हिने व्यक्त केले आहे. 

माधुरी पवारने नाव न घेता गौतमी पाटीलला दिले सल्ले

अभिनेत्री माधुरी पवारने नाव न घेता गौतमी पाटीलला सल्ले दिले आहेत. तसेच आडनाव बदलावे की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी तर माझ्या वडिलांकडून आलेलेच आडनाव ठेवले आहे. संघटनांनी आक्षेप घ्यावे असे तरी माझ्याकडून काहीही घडलेले नाही, असा टोला लगावत, कलावंतांची कुटुंब छान आनंदात एकत्रित राहणे गरजेचे आहे, असे माधुरीने नमूद केले. 

दरम्यान, माझ्या १५ वर्षाच्या कार्यकाळातील कार्यक्रमात एकदाही हुल्लडबाजी, धक्काबुकी झाली नाही. मी करीत असलेल्या नृत्यांना प्रेक्षकही प्रतिसाद देतात. अनेकजण कार्यक्रमानंतर भेट घेऊन कलेचे कौतुक करतात, असे माधुरी पवारने म्हटले आहे. तसेच ५ लाख भरल्याशिवाय कार्यक्रमाला पोलिसांकडून परवानगी मिळत नसेल, तर हे फार अवघड आहे. ज्यांना इच्छा आहे तेच ५ लाख भरतील. मात्र ज्यांना शक्य नाही ते दुसरे कलावंत बोलावतील. बंदोबस्त खर्चाचा इफेक्ट आमच्यावर होणार नाही, असे माधुरीने म्हटले आहे. 
  

Web Title: actor and dancer madhuri pawar reaction over gautami patil dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.